operation blue star anniversary : ऑपरेशन ब्ल्यु स्टारला ४० वर्ष आज पूर्ण झाले असून सुवर्ण मंदिरात अनेक खलिस्तान वाद्यांनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे पोस्टर हातात घेऊन देश विरोधात घोषणा दिल्या. आज सकाळी १० च्या सुमारास शिखांचे पवित्र धर्मस्थळ गोल्डन टेम्पलमध्ये खलिस्तानी जर्नेल सिंग भिंद्रनवाले व खलिस्तानच्या घोषणाही देण्यात आल्या. १९८४ मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४० व्या वर्धापन दिनाला विरोध करत शीख समुदायातील काहींनी या घोषणा दिल्या.
भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारला आज ४० वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्त राज्यात आज चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक शीख संघटनांनी आज संध्याकाळी खालसा मार्च काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. इतकेच नाही तर अनेक संघटनांनी आज अमृतसर बंदची हाक देखील दिली आहे. याला काही संघटना प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या सर्व प्रशिक्षण केंद्रातून २ हजार पोलिसांना फौजफाटा अमृतसरला बोलावण्यात आले आहे. याशिवाय अमृतसर देहाती, तरनतारन, बटाला, गुरुदासपूर आणि पठाणकोट या सीमावर्ती जिल्ह्यांतून देखील पोलीस दलांना अमृतसरला पाचारण करण्यात आले आहे. सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्यक्षात ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
श्री हरमंदिर साहिब परिक्रमा आणि श्री अकाल तख्त साहिबच्या आसपास साध्या वेशात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जे एसजीपीसी टास्क फोर्ससह अनेक जवानांना चौकाचौकात तैनात करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत खलिस्तानी अमृतपाल सिंग यांनी खडूर साहिब मतदारसंघातून दीड लाख मतांनी विजय मिळवला आहे. याशिवाय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा यांनीही फरीदकोटमधून विजय मिळवला आहे.
जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली फुटीरतावाद्यांनी वेगळ्या पंजाबची मागणी करत सुवर्ण मंदिरात आश्रय घेऊन तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला आव्हान दिले होते. केंद्र सरकारला १ जून ते ६ जून १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरातून फुटीरतावाद्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. याला ज्याला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आले. ६ जून रोजी लष्कराने सुवर्ण मंदिरात शिरून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या काळात सुवर्ण मंदिराचेही मोठे नुकसान झाले. अनेक लोक या कारवाईत मारलेही गेले. या घटनेला आज ४० वर्ष पूर्ण झाले आहे.
संबंधित बातम्या