केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा(Amit Shah)यांच्यावायनाड भूस्खलनाचा अलर्ट आठवडाभरापूर्वीच दिल्याच्यादाव्यावर केरळचेमुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनीखुलासा केला आहे.वायनाड भूस्खलनाच्या(Wayanad landslides) घटनेपूर्वीहवामान विभागाकडून कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आला नव्हता,असं मुख्यमंत्री विजयन म्हणाले.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा फेटाळून लावला. शहा यांनी दावा केला होता की, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होण्यापूर्वी राज्य सरकारला हवामानाचा इशारा देण्यात आला होता.
लोकसभेत लक्षवेधी प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, भूस्खलन होण्याच्या किमान आठवडाभर आधी भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) आठ पथके २३ जुलै रोजी तैनात करण्यात आली होती.
१८ जुलै रोजी केरळच्या पश्चिम किनारपट्टीवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. २५ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. २३ जुलै रोजीच एनडीआरएफची आठ पथके या भागात पाठवण्यात आली होती. वायनाड भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची केंद्राकडे विरोधकांकडे मागणी केली.
अमित शहांच्या दाव्यावर मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले , आयएमडीच्या इशाऱ्यानंतरही भूस्खलनापूर्वी वायनाडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नव्हता. ५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक पाऊस कोसळला.
विजयन यांच्या म्हणण्यानुसार, आयएमडीने केवळ ऑरेंज अलर्ट जारी केला होता, ज्यात ६ सेंमी ते २० सेंटीमीटर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला होता, तर २४ तासात २० सेंटीमीटरपेक्षा जास्त अतिमुसळधार पावसाचा इशारा देणारा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला नव्हता.
विजयन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी सकाळी भूस्खलन झाल्यानंतरच जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही आणि शहा यांच्या वक्तव्याला आपण विरोधाभासी पद्धतीने घेत नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शोध आणि बचाव कार्याची माहिती देताना विजयन म्हणाले की, आतापर्यंत १,५९२ लोकांना वाचविण्यात आले आहे आणि वायनाड जिल्ह्यात ८२ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यात २,०१७ लोक आश्रयाला आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आम्ही आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर करत आहोत आणि जे स्थलांतर करण्यास तयार नाहीत त्यांना जेवण पुरवत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आज बचावकार्यासाठी लष्कराचे अतिरिक्त १३२ जवान दाखल झाले आहेत. बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे. काल आणि काल रात्री दोन्ही ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले.
संबंधित बातम्या