डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

Dec 03, 2024 03:37 PM IST

Kerala Bus Accident : बस व कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अलप्पुझा येथे झाला.

कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू
कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

Kerala Road Accident : केरळमध्ये एका भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील अलप्पुझा येथे सोमवारी रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. केरळ महामंडळाची बस व कारची जोरात धडक झाली. या अपघातात कारमधील ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी आहेत. मृत व जखमी विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. जखमींवर रुग्णालात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलारकोडजवळ रात्री १०वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बस व कारची धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला होता. सर्व मृतदेहांचा चेंदामेंदा झाला होता व कारमध्ये अडकून पडले होते. कारच्या काचा फोडून व पत्रा कापून मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातग्रस्त तरुण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे विद्यार्थी होते.हाअपघात कलारकोड गावाजवळ येथे सोमवारी रात्री १०च्या सुमारास झाला.

दरम्यान अपघातात दगावलेले पाचही जण हे शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)चे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या विद्यार्थ्यांची ओळख पटू शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त कारमध्ये सात जण प्रवास करत होते, ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थली धाव घेत वाहतूक सुरुळित केली.

पहिल्या पोस्टिंगसाठी जात असलेल्याIPSअधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू -

अशाच प्रकारचा अपघात कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात झाला. या अपघातात एका २६ वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हर्ष वर्धन असं या मृत अधिकाऱ्याचं नाव असून ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. हर्ष वर्धन हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते आणि ते पोलिसांच्या वाहनाने होलेनरसीपूर येथे त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी ड्युटीवर जात होते. मात्र,पहिल्या पोस्टिंगसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात रविवारी संध्याकाळी झाला. हर्ष वर्धन प्रवास करत असलेल्या पोलीसांच्या गाडीचे अचानक टायर फुटल्याने चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका घरावर आणि झाडावर जाऊन आदळली. यात हर्षवर्धन यांचा मृत्यू झाला. त्यांनी राज्य सरकारची नोकरी सोडून आयपीएस होण्याचा निर्णय घेतला होता.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर