Viral News : केरळमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना मोठा धक्का बसला असून नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. केरळ येतील कालिकत येथे रस्त्यावर दोन गटात जोरदार हाणामारी झाली. तेवढ्यात एक रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिका येताच दोन्ही गटाने भांडणे थांबवून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. मात्र, तेथून रुग्णवाहिका जाताच पुन्हा त्यांनी हाणामारी सुरू केली.
केरळमधील कालिकत मध्ये स्थानिक सहकारी बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये काही कारणावरून हाणामारी झाली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांनी बंडखोरी करून वेगळा गट तयार केला असून या गटाला माकपचाही पाठिंबा आहे. बंडखोर गटाने निवडणूक जिंकली आणि बँकेच्या संचालक मंडळावर त्यांनी ताबा मिळवला. या मंडळावर ६१ वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, बंडखोरांनी ही बँक ताब्यात घेतली आहे. या वरून या दोन्ही गटात हाणामारी झाली.
इस्रायल थांबेचना! बैरूतवर हल्ला करून हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा खातमा; लेबनॉनमध्ये पळापळ
या दोन गटांत झालेल्या हाणामारीदरम्यान अचानक एक रुग्णवाहिका रस्त्यावर आली. या पार्श् वभूमीवर दोन्ही गटांनी चांगुलपणा दाखवत रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुढे आले. काहींनी हाताने बोट दाखवून मार्ग दाखवला. या घटनेनंतर दोन्ही गटातील भांडण थांबेल असे हा सगळा प्रकार पाहत असणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांना वाटले. पण त्यांचा भ्रमनीरास झाला. काही क्षणापूर्वी चांगुलपणा दाखवणारे दोन्ही गटाने रुग्णवाहिका जातात पुन्हा हाणामारी सुरू केल्याने त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. हा प्रकार पाहणाऱ्या एकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने त्याखाली लिहिलं की, 'आधी सिव्हिक सेन्स, नंतर भांडणे'.
या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून शेअर देखील केला आहे. यातील काहींनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर दोन्ही गटातील लोकांना त्यांनी मूर्ख म्हटलं आहे.