मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mass Suicides: राहत्या घरात आढळले एकाच कुटुंबियातील पाच जणांचे मृतदेह, परिसरात खळबळ
Crime
Crime

Mass Suicides: राहत्या घरात आढळले एकाच कुटुंबियातील पाच जणांचे मृतदेह, परिसरात खळबळ

25 May 2023, 19:43 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Kannur: केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एकाच कुटुंबियातील पाच जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Five member family found dead in Kerala: केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील चेरुपडामध्ये एका राहत्या घरात कुटुंबियातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. मृतांमध्ये एका दाम्पत्यासह तीन मुलांचा समावेश आहे. दाम्पत्यांनी मुलांची हत्या करुन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शाजी आणि स्रिजा असे मृतावस्थेत आढळलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर, सूरज, सुरभी आणि सुजीत अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. शाजी आणि स्रिजा यांचे अगोदर लग्न झाले होते. स्रिजाला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत. तर, शाजीची एक दुसरी पत्नी असून तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. शाजी आणि स्रिजा यांनी दीड वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्न केले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत भांडण सुरू होते.त्याबद्दलच्या अनेक तक्रारी चेरुपुज्हा पोलीस ठाण्यात आहेत.

दरम्यान, शाजी आणि स्रिजा यांच्यासह घरातील तीन मुलांचे मृतदेह घरात आढळून आल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याने अगोदर मुलांची हत्या करुन स्वत: गळफास घेतला, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

केरळ: एकाच कुटुंबियातील चौघांची आत्महत्या

केरळमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकाच कुटुंबियातील चा जणांनी आत्महत्या केली. कौटुंबिक वादाला कंटाळून या चौघांनी भरतपुझा नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता.

विभाग