केरळमधील उत्तरी कासरगोड जिल्ह्यात 'गूगल मॅप्स' चा वापर करून रुग्णालयाचा रस्ता शोधत जाणे दोन तरुणांच्या चांगलेच अंगलट आले. गूगल मॅपमध्ये रस्ता पाहून जाण्यामुळे त्यांच्या कार दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत गेली. कार अचानक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागली व त्यानंतर नदीकिनारी असलेल्या एका झाडाला जाऊन अडकली. त्यानंतर रेस्क्यू टीमने गाडीतील तरुणांना वाचवले.
रविवारी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दिसते की, पल्लांची येथी महापूर आलेल्या नदीतून अग्निशमन विभागाने कर्माचारी तरुणांना बाहेर काढत आहेत. जेव्हा त्यांची कार पाण्यासोबत वाहत जाऊन कार एका झाडाला अडकली. त्यानंतर तरुणांनी बाहेर येत आपले लोकेशन अग्निशमन पथकाला पाठवले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रस्सीच्या मदतीने दोन्ही तरुणांना बाहेर काढले.
सुरक्षित बाहेर काढलेल्या तरुणांनी सांगितले की, ते कर्नाटक राज्यातील एका रुग्णालयात जात होते. रस्ता माहीत नसल्याने ते 'गूगल मॅप्स' चा वापर करत पुढे जात होते. या तरुणांपैकी एक असलेल्या अब्दुल रशीद यांनी सांगितले की, 'गूगल मॅप्स' च्या माध्यमातून त्यांना समजले की, पुढे एक अरुंद रस्ता आहे. त्यानंतर त्यांनी त्या रस्त्याने कार नेली. मात्र तो रस्ता नसून एक नदी होती. मागील वर्षी केरळमध्ये २९ वर्षीय एका डॉक्टरचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. ते अशाच प्रकारे गूगल मॅपच्या सहाय्याने रस्ता पाहात होते व गाडी थेट पेरियार नदीत गेली होती.
गूगल मॅप्स एक वेब सर्विस आहे, जी जगभरातील भौगोलिक क्षेत्र आणि स्थानांबाबत सविस्तार माहिती देते. पारंपरिक रस्ते, नकाशे त्याच्याबरोबर 'गूगल मॅप्स' अनेक ठिकाणांच्या हवाई फोटो व उपग्रह फोटोही देते. त्यांनी एका टीवी चॅनलशी बोलताना म्हटले की, गाडीच्या हेडलाइटमध्ये आम्हाला दिसले की, समोर पाणी आहे. मात्र आम्हाला दिसले नाही की, दोन्ही बाजुला नदी होती, व मध्यभागी पूल होता. कार अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. तरुणांचे नशीब बलवत्तर होते म्हणून कार झाडाला जाऊन अडकली व त्यांचा जीव वाचला.
संबंधित बातम्या