ndian House Crows vs Kenyan government : कावळा हा पर्यावरण पूरक पक्षी आहे. पर्यावरणातील घाण कावळे साफ करत असतात. भारतात कावळ्यांना धार्मिक महत्व आहे. या कावळ्यांची पूजा देखील केली जाते. तसेच कावळा हा अत्यंत हुशार आणि बुद्धिवान पक्षी देखील समजला जातो. भारतीय जातीचे कावळे जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, हेच कावळे केनिया सरकारची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळं थेट सरकारनचं केनियातील तब्बल १० लाख भारतीय जातीच्या कावळ्यांचा जीव घेण्याचा फतवा काढला आहे. केनिया सरकारच्या या अगल्या वेगळ्या निर्णयामुळे जगभरातील प्राणी व पक्षी प्रेमी विरोध करू लागले आहे. मात्र, या कावळ्यांमुळे केनियातील पर्यावरणाला आणि शेतीला हानी पोहचत असल्याचं सरकारच म्हणणं आहे. या सोबतच हे कावळे नागरिकांना उपद्रव देत असल्याने देखील त्यांना मारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
केनिया सरकारने २०२४ च्या अखेरपर्यंत मूळ भारतीय वंशांचे (कॉर्वस स्प्लेंडेंस) तब्बल १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे. हे कावळे स्थानिक पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव टाकत असून हे कावळे जनतेला त्रास देत आहेत. केनियाच्या किनारी भागात या कावळ्यांचा सर्वाधिक उपद्रव आहे. भारतीय वंशांच्या कावळ्यांमुळे पर्यटन, शेती, हॉटेल व्यवसायावर परिणाम झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
भारतीय वंशाचे कावळे हे परदेशी आहेत. या कावळ्यांचा केनियाच्या पर्यावरणात काही उपयोग नाही. त्यांची गरज देखील या ठिकाणी नाही. या कावळ्यांची वाढती संख्या स्थानिक नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. हे कावळे मोठ्या प्रमाणात शेती व पर्यावरणाचे नुकसान करत आहेत. या सोबतच हॉटेल्समधील खाद्यपदार्थांवर देखील हे कावळे तुटून पडत असून येथील स्थानिक व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या कावळ्यांनी भारतातून व काही आशियायी देशांमधून जहाजाद्वारे स्थलांतर करत थेट केनियात पोहोचले आहे. गेल्या काही वर्षात या कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात केनियात वाढली आहे.
केनिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार या कावळ्यांमुळे स्थानिक जीवसंस्था व परिसंस्थेवर परिणाम झाला आहे. या कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक पक्षी लुप्त होत आहेत. हे कावळे स्थानी पक्ष्यांच्या भक्ष्य बनवत आहेत. त्यांना त्रास देत असल्याने स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहे. हे कावळे टयांची घरे नष्ट करतात. इतर पक्षांची अंडी फोडून पिल्ले खातात. त्यामुळे केनियातील इकोसिस्टम नष्ट होत असल्याचे मत स्थानीक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पर्यावरणातून जर पक्षी कमी झाले तर कीड व कीटक वाढत असल्याने मोठी हानी होत आहे. याचा परिमाण शेतीवर देखील होत आहे. हे कावळे पिकांना नुकसान कारक ठरत आहे. हे कावळे झुंडीने शेतकऱ्यांनी पळलेल्या कोंबड्यांवर देखील हल्ले करत आहेत. हे कावळे एका दिवसाला तब्बल १० टे १५ कोंबड्यांचा जीव घेऊन त्यांना भक्ष्य बनवत असल्याचे वृत्त हे डाऊन टू अर्थने दिले आहे.
या कावळ्यांमुळे केनियातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर असलेला या देशात वन्यजीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी व ते पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, भारतीय वंशाच्या वाढत्या कावळ्यांमुळे येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे देखील सरकारने १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला. केनियामध्ये २० वर्षांपूर्वी देखील असाच प्रयोग करण्यात आला होता. १९९९ व २००५ दरम्यान केनियाच्या किनारपट्टीवरील मालिंदी या शहरातील कावळे नष्ट करण्यासाठी स्टरीलिसाइज्ड नावाचा एव्हीयन विषप्रयोग केला होता. त्यावेळी ५० टक्के कावळे नष्ट झाले होते. यानंतर सरकारने स्टरीलाइज्डच्या आयातीवर बंदी घातली. त्यामुळे हे कावळे पुन्हा वाढले आहेत. या कावळ्यांच्या प्रजननाचा वेग जास्त आहे. त्यामुळे जितक्या कावळ्यांना मारण्यात येते, तितकेच कावळे पुन्हा नव्याने जन्माला येतात.
संबंधित बातम्या