'केजरीवाल झुकेगा नहीं'; AAP चा BJP वर 'पुष्पा' स्टाईल पलटवार, दिल्ली निवडणुकीआधीच तीव्र झाले पोस्टर वॉर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'केजरीवाल झुकेगा नहीं'; AAP चा BJP वर 'पुष्पा' स्टाईल पलटवार, दिल्ली निवडणुकीआधीच तीव्र झाले पोस्टर वॉर

'केजरीवाल झुकेगा नहीं'; AAP चा BJP वर 'पुष्पा' स्टाईल पलटवार, दिल्ली निवडणुकीआधीच तीव्र झाले पोस्टर वॉर

Dec 08, 2024 01:49 PM IST

Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्षात पुन्हा एकदा पोस्टर वॉर पेटले आहे. एकीकडे भाजप आपल्या पोस्टरमधून 'आप'चे घोटाळे उघड करत आहे, तर 'आप'नेही 'पुष्पा' स्टाईलने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

AAP Vs BJP पोस्टर वॉर
AAP Vs BJP पोस्टर वॉर (Photo by @AamAadmiParty/@BJP4Delhi Twitter)

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्षात पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरू झाले आहे. या राजकीय लढाईत दोन्ही राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले  जात आहेत. भाजप आपल्या पोस्टरमधून 'आप'चे घोटाळे उघड करण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी 'आप'नेही 'पुष्पा' शैलीत भाजपवर हल्ला बोल सुरू केला आहे.

भाजपने शनिवारी एक पोस्टर जारी करून आप सरकारच्या कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकला आहे. पोस्टरमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा ही फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये दारू, मोहल्ला क्लिनिक, हवाला, सुरक्षा, रेशन, पॅनिक बटन, शीश महल, औषधे, दिल्ली जल बोर्ड, क्लासरूम आणि सीसीटीव्ही घोटाळे यासह केजरीवाल सरकारचे अन्य घोटाळे दाखवण्यात आले आहेत.

भाजपच्या पोस्टरबाजीला प्रत्युत्तर म्हणून आम आदमी पक्षानेही आपल्या पोस्टर्समध्ये दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या एका पोस्टरमध्ये 'आप'ने अरविंद केजरीवाल यांना झाडू दाखवत 'पुष्पा' शैलीत 'फिर आ रहा है केजरीवाल' म्हणत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'केजरीवाल झुकेगा नही', केजरीवाल लवकरच चौथ्या टर्मसाठी येत आहेत.

शनिवारी दिल्ली भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 'अब नहीं सहेंगे, बदल कर रहेंगे' असा नारा दिला होता. यावेळी बोलताना भाजप नेते म्हणाले की, दिल्लीच्या जनतेला आता खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि आता प्रदुषित पाणीपुरवठा, खराब झालेले रस्ते, महागडी वीज आणि प्रदूषणाच्या उच्च पातळीपासून दिलासा मिळवण्यासाठी 'आप'ला सत्तेतून हटवायचे आहे.

 

विरोधी पक्षाच्या 'बदल के रहेंगे'च्या घोषणेवरून दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारची सर्व कामे थांबवायची आहेत, हे दिसून येते, असा दावा 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.

"त्यांनी आज अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते सर्व काही बदलतील. म्हणजे २४ तास वीजपुरवठा खंडित होईल आणि हजारो रुपयांच्या लांबलचक बिलांसह वीजपुरवठा खंडित होईल, महिलांसाठी मोफत बसप्रवास थांबेल, सर्व शाळा उद्ध्वस्त होतील, मोहल्ला क्लिनिक बंद होतील आणि मोफत औषधे व उपचारही बंद होतील.

भाजपने आपला हेतू स्पष्ट केल्याने नागरिकांनी सावधगिरीने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक होणार आहे. १९९८ पासून भाजप दिल्लीत सत्तेपासून दूर आहे. २०१५ पासून आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर सत्तेत आहे. भाजपला २०१५ मध्ये तीन आणि २०२० मध्ये केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर