मुलीच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध, प्रियकराने तरुणीच्या घरासमोरच जिलेटिनच्या कांड्यांनी स्वत:ला उडवले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुलीच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध, प्रियकराने तरुणीच्या घरासमोरच जिलेटिनच्या कांड्यांनी स्वत:ला उडवले

मुलीच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध, प्रियकराने तरुणीच्या घरासमोरच जिलेटिनच्या कांड्यांनी स्वत:ला उडवले

Dec 30, 2024 05:28 PM IST

कर्नाटकात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या घरच्यांनी नकार दिल्याने व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केली. तरुणीच्या घरासमोरच तरुणाने जिलेटिनच्या कांड्याने स्वत:ला उडवून घेतले.

प्रियकराची प्रेयसीच्या घरासमोर आत्महत्या
प्रियकराची प्रेयसीच्या घरासमोर आत्महत्या (File Photo)

कर्नाटकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे मुलीच्या घरच्यांनी प्रेमास नकार दिल्याने व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. तरुणीच्या घरासमोर तरुणाने जिलेटिनच्या कांड्याने स्वत:ला उडवून घेतले. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कलेनाहळ्ळी गावात ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी रामचंद्र हा मुलीसोबत पळून गेला होता आणि त्याला पॉक्सो अंतर्गत अटकही करण्यात आली होती. जिलेटिनच्या कांड्या स्वस्त स्फोटक सामग्री आहेत जी सामान्यत: खाण काम आणि बांधकाम उद्योगांमध्ये वापरली जातात. जिलेटिनच्या कांड्या सक्रिय करण्यासाठी डेटोनेटरची गरज होती.

मृत रामचंद्र नागमंगला तालुक्यातील शेजारच्या जिल्ह्यातील रहिवासी होता.  मुलीच्या घरच्यांनी त्याचे प्रेम नाकारल्याचं बोललं जात आहे. तेव्हापासून तो खूप निराश झाला होता. पॉक्सो अंतर्गत अटक झाल्यानंतर रामचंद्रने तीन महिने तुरुंगवास भोगला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो मुलीच्या घरी पोहोचला आणि तडजोड केली. मुलीच्या घरच्यांनी न्यायालयात ही केस बंद करण्यात आली होती. यानंतर तरुणाने पुन्हा मुलीशी बोलण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे कुटुंबीय तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचा विचार करत होते. घरचे लोक मुलगी कायदेशीर प्रौढ होण्याची वाट पाहत होते. तिला अजून १८ वर्षे पूर्ण झालेली नाहीत.

दरम्यान, रविवारी रामचंद्र अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचला. सोबत जिलेटिनच्या कांड्याही आणल्या होत्या. त्याने मुलीच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या पसरवल्या होत्या. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलेटिनच्या स्फोटात मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबाचा खाणीचा व्यवसाय होता आणि अशा प्रकारे त्याला जिलेटिनच्या कांड्या मिळाल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर