मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  karnataka news : रामायण महाभारत काल्पनिक! पंतप्रधान मोदींवर टीका; कर्नाटकात शिक्षिका निलंबित

karnataka news : रामायण महाभारत काल्पनिक! पंतप्रधान मोदींवर टीका; कर्नाटकात शिक्षिका निलंबित

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2024 01:20 PM IST

karnataka school teacher tells students mahabharat ramayan imaginary : महाभारत आणि रामायण हे काल्पनिक आहे असे मुलांना शिकवल्याचा आरोप कर्नाटकातील एका शाळेतील शिक्षिकेवर करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने तिला निलंबित करण्यात आले आहे.

karnataka
karnataka

karnataka school teacher tells students mahabharat ramayan imaginary : कर्नाटकातील एका प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने वर्गातील मुलांना चुकीच्या पद्धतीने शिकवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षिकेने मुलांना महाभारत आणि रामायण हे काल्पनिक असल्याचे सांगितले असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद व्यक्तव्य केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी मोठा वाद आणि आंदोलने केल्यावर शाळा प्रशासनाने कठोर कारवाई करत या शिक्षिकेला सेवेतून निलंबित केले आहे. या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला जाईल, असे देखील काही संघटनांच्या गटाचे म्हणणे आहे.

Pune traffic update : श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या मध्य भागातील वाहतुकीत बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद

हे प्रकरण कर्नाटकातील मंगळुरू येथील प्रसिद्ध कॉन्व्हेंट स्कूलशी संबंधित आहे. शहरातील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी स्कूलमधील एका शिक्षिकेने वर्गात विद्यार्थ्यांना महाभारत आणि रामायण 'काल्पनिक' असल्याचे शिकवले असल्याचा आरोप भाजपचे आमदार वेदास कामत यांच्याशी संबंधित एका गटाने केला आहे.

पीएम मोदींबद्दल केले अपमानास्पद वक्तव्य

या शिक्षिकेने २००२ मधील गोध्रा दंगल आणि बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद व्यक्तव्य केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. संबंधित महिला शिक्षिका या मुलांच्या मनात द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे या संघटनेने केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी शनिवारी मोठी निदर्शने करण्यात आली. तर आज भाजप आमदारांनीही त्यात सामील होऊन शिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता कधी मिळणार? पाहा लाभार्थ्यांची यादी

भाजप आमदाराने शाळा प्रशासनाला धारेवर धरत म्हटले की, 'तुम्ही अशा शिक्षकाचे समर्थन करणार असाल, तर तुमच्या नैतिकतेचे काय झाले? तुम्ही या शिक्षिकेला पाठीशी का घालत आहात ? आजच्या श्रद्धेचा अपमान केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे.

दरम्यान, मुलांच्या पालकांनी असा दावा केला की शिक्षिकेने इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना भगवान राम "काल्पनिक" असल्याचे शिकवले. सार्वजनिक सूचना उपसंचालक (डीडीपीआय) या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर या शिक्षिकेला तिच्या वक्तव्यावरून शाळेने बडतर्फ केले आहे.

शाळेने एका पत्रात म्हटले आहे की, "सेंट गेरोसा शाळेचा इतिहास ६० वर्षांचा आहे. शाळेत आजपर्यंत अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे आमच्याबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. तुमच्या सहकार्याने हा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. दरम्यान, या शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग