कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमकुरु जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरच्या परिसरात एका तलावाकिनारी एक जळालेल्या कारमध्ये पूर्णपणे जळालेले तीन मृतदेह आढळले आहेत. यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. कर्नाटकची राजधानी बंगळुरुपासून तुमकुरु जवळपास ७० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, तिघांना खजिन्याचे आमिष दाखवून लुटले व त्यानंतर त्यांची हत्या केली असावी. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, कारमधून पूर्णपणे जळालेले मृतदेह आढळले ती कार कुचांगी तलावाजवर सापडली. तिघे मृत व्यक्ती कर्नाटक राज्यातील मंगलुरु जिल्ह्तील बेलथांगडी तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांना याबाबत काही पुरावे मिळाले आहेत. लवकरच संपूर्ण टोळी पकडली जाईल, अशी माहिती तुमकुरु पोलिसांनी दिली. या तिघांनाही गोपनीय खजिन्याचे आमिष दाखवून लुटले असावे. त्यानंतर तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह कारमध्ये ठेवले व एका तलावाजवळ कारमध्ये टाकून कार पेटवून देण्यात आली.
पोलिसांना कुंचागी गावातील एका तलावाजवळ जळालेली कार सापडली होती. तपास केला असता त्यामध्ये तीन जणांचे मृतदेह मिळाले होते. तिघांची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह येथे आणून जाळले होते. मृतदेह कारमध्ये ठेऊन कार पेटवल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दोन मृतदेह गाडीच्या मागील टिकीत तर एक मृतदेह मागच्या सीटवर होता.
हे प्रकरण गोपनीय खजिना मिळवण्यासंदर्भात आहे. आरोपींनी तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून बोलवलं होतं. आरोपींनी तिघांना आमिष दाखवलं की, त्यांना गुप्त खजिना सापडला असून त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आहेत. ते स्वस्त दरात विकायचे असल्याचे सांगून त्यांना भेटायला बोलावले होते. त्यामुळे हत्या झालेले तिघेही पैसे घेऊन आरोपींना भेटायला गेले होते. तेथे तिघांकडील पैसे लुटून त्यांची हत्या केली असल्याचा संशय आहे.
या गुन्ह्यांमध्ये ६ आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून त्यातील तिघांची ओळख पटली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी तीन जणांची हत्या करून त्यांनी ओळख पटू नये म्हणून त्यांना कारमध्ये टाकून पेटवले.
संबंधित बातम्या