प्रेमी युगुल समजून भाऊ-बहिणीला ३ तास बेदम मारहाण, पोलिसांमुळं वाचला जीव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रेमी युगुल समजून भाऊ-बहिणीला ३ तास बेदम मारहाण, पोलिसांमुळं वाचला जीव

प्रेमी युगुल समजून भाऊ-बहिणीला ३ तास बेदम मारहाण, पोलिसांमुळं वाचला जीव

Updated Jan 08, 2024 03:45 PM IST

Belagavi Mob Lynching: कर्नाटकातील बेळगाव येथे मावस भाऊ- बहिणीला प्रेमीयुगुल समजून मारहाण केल्याप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime
Crime (HT_PRINT)

Karnataka Belagavi Mob Lynching News: मावस भाऊ- बहिणीला प्रेमीयुगुल समजून ३ तास बेदम मारहाण बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना कर्नाटकातील बेळगावी येथे घडली. पोलिसांमुळे दोघांचाही जीव वाचला. याप्रकरणी १७ जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केल्याची माहिती आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, मावस भाऊ- बहिण कर्नाटक सरकारच्या युवा निधीसाठी अर्ज करण्यासाठी बेळगावी आले होते. सर्व्हरच्या समस्येमुळे त्यांना उशीर झाला. त्यानंतर दोघेही जवळच्या तलावावर गेले. मुलीचे वय २४ तर, मुलाचे वय २१ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही यमनापूर गावचे रहिवासी आहेत. तलावाजवळील काही रहिवाशी लोकांनी त्यांना जोडपे समजून जवळपास ३ तास बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी १७ आरोपींपैकी नऊ जणांना अटक केली आहे, यात दोन अल्पवयीन आहेत. दोघांच्या आई सख्या बहिणी आहेत. मात्र, त्यांच्या आईंनी वेगवेगळ्या धर्मात लग्न केले. दोघांनी जमावाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, एकानेही त्यांचे ऐकले नाही आणि त्यांना मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेच्या वेळी मुलीने तिच्या नातेवाईकालाही बोलावले आणि ते मावस भाऊ असल्याचे समजावून सांगण्यास सांगितले. मात्र, येथील जमावाने काहीही न ऐकता मारहाण सुरूच ठेवली. मुलाच्या नातेवाईकाने त्याला फोन केला असता फोन बंद होता. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलाचे नातेवाईक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळी त्यांना दोन्ही मुलांचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर