कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, सावरकर एक ब्राह्मण होते तरीही मांसाहार करत होते. ते गोमांस खात होते. त्यांनी कधीही गो हत्येचा विरोध केला नाही. याबाबत त्यांचे विचार खूपच आधुनिक होते. त्यांचे विचार एकीकडे मूलत्तववादी होते तर दुसरीकडे आधुनिक होते. ते एक ब्राह्मण असूनही मांस खात होते व याचा प्रकार करत होते. त्यांनी म्हटले की, मोहम्मद अली जिन्ना यांच्याहून सावरकर अधिक कट्टरवादी होते.
सावरकर स्वत: मांसाहारी असल्याने गोहत्येच्या विरोधात नव्हते, असा दावा दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. सावरकर मांसाहारी होते आणि ते गोहत्येच्या विरोधात नव्हते. ब्राह्मण असूनही ते मांस खात असत आणि खुलेआम मांस खाण्यास प्रोत्साहनही देत असत. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी गांधी आणि सावरकरांच्या विचारांची तुलनाही केली. पत्रकार धीरेंद्र झा यांच्या 'गांधींचा मारेकरी : नथुराम गोडसेची निर्मिती आणि भारताविषयीचे त्यांचे विचार' या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी राव बोलत होते.
सावरकरांची विचारधारा मूलतत्त्ववादाकडे झुकलेली होती, तर गांधीजींची श्रद्धा अत्यंत लोकशाहीवादी होती. ते म्हणाले की, गांधींच्या कार्यात सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता प्रतिबिंबित होते ज्यामुळे ते मूलगामी विचारांपासून वेगळे होते. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची मानसिकता आणि त्या दु:खद क्षणाभोवती घडलेल्या घटनांचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. सावरकरांचा गोडसेच्या विचारांवर कसा प्रभाव पडला, याचाही यात आढावा घेण्यात आला आहे. सावरकरांच्या विचारधारेचा वाढता प्रभाव आणि आज च्या कट्टरतावादाच्या वाढत्या लाटेला गांधींचा लोकशाहीवरील विश्वास हे एक सशक्त उत्तर आहे.
गुंडू राव यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला खोटेपणाची फॅक्टरी म्हटले असून सावरकरांचा कोणत्याही प्रकारचा अनादर देश खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जगभरात खोटे बोलले आणि त्यांच्या पक्षाने आता स्वातंत्र्यसैनिकांची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला. सावरकरांचा अपमान भारत खपवून घेणार नाही: अनुराग ठाकूर काँग्रेसच्या नेत्यांनी वीर सावरकरांकडून काहीही शिकलेले नाही आणि केवळ सत्तेचा उपभोग घेतला आहे.
सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हटले आहे की, सावरकरांनी गोरक्षणाचे जोरदार समर्थन केले होते आणि त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यापूर्वी मार्च महिन्यात रणजित यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केला होता की, ते आपल्या राजकीय फायद्यासाठी सावरकरांचा वारंवार अपमान करत आहेत.
संबंधित बातम्या