BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, POCSO प्रकरणात अटकेला स्थगिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, POCSO प्रकरणात अटकेला स्थगिती

BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, POCSO प्रकरणात अटकेला स्थगिती

Updated Jun 14, 2024 05:54 PM IST

BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना अटकेपासून संरक्षण देत हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र त्यांना १७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते बीएस. येडियुरप्पा यांना POCSO प्रकरणात अजामीनपात्र अटक वारंटप्रकरणी हायकोर्टाकडून मोठा दिलसा मिळाला आहे. भाजप नेत्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टाने पुढच्या सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती दिली आहे. दरम्यान कोर्टाने येडियुरप्पा यांना आदेश दिला आहे की, त्यांनी १७ जून रोजी तपास यंत्रणांसमोर हजर व्हावे.

पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला १७ जून रोजी तपास यंत्रणांसमोर हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
 


अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेंगळुरू कोर्टाने येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत मुलीच्या आईने बेंगळुरूच्या सदाशिवनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या भावाने चार वेळा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या युडियुरप्पा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

येडियुरप्पा यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो कायद्यातील अटकेपासून बचाव करण्यासाठी विशेष न्यायालयात (लोकप्रतिनिधी न्यायालय) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. येडियुरप्पा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस सरकार द्वेषाचे व सूडाचे राजकारण करत आहे. मात्र कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे.
 

Rahul Gandhi: वायनाड की रायबरेली? राहुल गांधींसमोर धर्मसंकट! म्हणाले, मोदींप्रमाणे देव मला मार्गदर्शन करत नाही!
'मी या प्रकरणाबाबत तपशीलात गेलो नाही. काँग्रेस पक्ष कोणाचाही तिरस्कार करत नाही. जर मी द्वेषाच्या राजकारणाबद्दल बोललो तर ते इतरत्र जाईल, म्हणून मला बोलायचे नाही... मला (येडियुराप्पांबद्दल) दया येते, कारण मलाही त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. मला वेदना माहित आहेत, असे शिवकुमार म्हणाले.



कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, येडियुरप्पा बेंगळुरूला परत आले आणि पॉक्सो प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) हजर झाले तर चांगले होईल.
त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना चौकशीसाठी आणले जाईल आणि त्याच्याकडून माहिती गोळा केली जाईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून होत असलेल्या सूडाच्या राजकारणाबाबत विचारल्यानंतर परमेश्वर यांनी म्हटले की, त्यांना असं बोलावं लागते. ते दुसरं काय म्हणणार.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर