मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM मोदी म्हणजे भारत नाही, भाजप-RSS वर टीका करणे देशाचा अपमान कसा?; राहुल गांधींचा सवाल

PM मोदी म्हणजे भारत नाही, भाजप-RSS वर टीका करणे देशाचा अपमान कसा?; राहुल गांधींचा सवाल

Mar 21, 2023 10:00 AM IST

Rahul Gandhi on Bjp And Modi : भाजप-संघावर हल्ला करणे म्हणजे देशाचा अपमान कसा. राहुल यांनी म्हटले की, भाजप व संघ हे विसरले आहेत की, देशात कोट्यवधी लोक राहतात. हा देश केवळ संघ, भाजप किंवा मोदी यांचा नाही.

Rahul Gandhi on Bjp And Modi
Rahul Gandhi on Bjp And Modi

Rahul Gandhi on Bjp And Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. राहुल यांनी बेळगावमध्ये एका सभेला संबोधित करताना राज्यातील तरुणांना अनेक आश्वासने दिली तर भाजपवरही जोरदार हल्लोबोल केला. राहुल यांनी म्हटले की, कर्नाटकमधील भाजप सरकार देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 राहुल गांधी तरुणांना उद्देशून म्हणाले की, भाजप सरकार तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे की, आम्ही प्रत्येक बेरोजगार पदवीधर तरुणांना प्रति माह ३ हजार रुपये आणि डिप्लोमा होल्डरला दीड हजार रुपये दिले जाईल. आम्ही लक्ष्य निश्चित केले आहे की, पुढील पाच वर्षात कर्नाटकमध्ये १० लाख तरुणांना नोकरी दिली जाईल. 

राहुल यांनी कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, कर्नाटक मधील भाजप सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारला काहीही करण्यासाठी  '४०% कमीशन' द्यावे लागते. ४०% कमीशनचा आरोप काँग्रेसचा प्रत्येक नेता कर्नाटक सरकारवर लावत आहे. याविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, कर्नाटकमध्ये ४० टक्के कमीशन थेट भाजप नेत्यांना जाते आणि ६० टक्के पार्टी फंडात जाते. दरम्यान यावेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. 

लंडन वादावर प्रतिक्रिया.. 

आता राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या लंडनमधील वक्तव्यावरही देशभरात टीका-टिप्पणी होत आहे. यावर राहुल गांधी म्हणाले की, भाजप-संघावर हल्ला करणे म्हणजे देशाचा अपमान कसा. राहुल यांनी म्हटले की, भाजप व संघ हे विसरले आहेत की, देशात कोट्यवधी लोक राहतात. हा देश केवळ संघ, भाजप किंवा मोदी यांचा नाही. आणि तसेही पंतप्रधान, भाजप किंवा संघावर आरोप केल्याने देशाचा अपमान होत नाही. दोन्हीत खूप फरक आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४