मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Newschecker HT Marathi
Jun 06, 2024 03:00 PM IST

Karnataka Cow Slaughter Viral Video: कर्नाटकात मुस्लिम बांधवांनी खुलेआम गोहत्या केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कर्नाटकात मुस्लीम बांधवांनी गोहत्या केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कर्नाटकात मुस्लीम बांधवांनी गोहत्या केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Karnataka Cow Slaughter Video Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या जीपच्यावर गाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या माध्यमातून कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सोशल मीडियार व्हायरल झालेल्या या व्हिडिओमागील सत्य समोर आले.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १७ सेकंदाचा आहे, ज्यात एक गाय जीपला बांधलेली दिसत आहे. या जीपच्या आसपास नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एक्सवरून १४ मे २०२४ रोजी शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून गायींची खुलेआम कत्तल' असे लिहिण्यात आले.

 

Fact Check
Fact Check

सत्य काय?

यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला, ज्यात ही घटना केरळमधील वायनाड येथील आहे, जिथे वाघाच्या हल्ल्यामुळे या गायीचा मृत्यू झाला. यावर संतापलेल्या नागरिकांनी गाईचे शव वन विभागाच्या जीपला बांधले.

Fact Check
Fact Check

१७ फेब्रुवारी 2024 रोजी मनोरमाने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये पुल्लापल्ली शहरातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या निषेधार्थ वाघाने मारलेली गाय वनविभागाच्या जीपला बांधली गेल्याची पुष्टी मिळते.

Karnataka Cow Slaughter Video Fact Check
Karnataka Cow Slaughter Video Fact Check

दरम्यान, १८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जंगलात झालेल्या हल्ल्यात वन विभागाचे पर्यवेक्षक व्हीपी पॉल मारले गेले. ज्याच्या निषेधार्थ शेकडो लोक पुलापल्ली शहरातील रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मानव- वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. वृत्तानुसार, संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. मात्र जमावाने वनविभागाची जीप अडवून तिचे नुकसान केले आणि वाघाने मारलेल्या गायीचा मृतदेह आणून जीपच्या बोनेटवर बांधले.

Fact Check
Fact Check

या घटनेसंदर्भात इतर न्यूज वेबसाईटने प्रकाशित केलेले रिपोर्ट वाचण्यासाठी येथे आणि येथे क्लिक करा.

निष्कर्ष: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोहत्येचा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Checker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग