कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत खराब होती. हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातील आमच्या काही नेत्यांची काल बैठक झाली आणि निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची जी माहिती आम्हाला मिळाली ती धक्कादायक आहे. प्रत्येक मतदारसंघात नव्हे, तर निवडक मतदारसंघात व्होटिंग मशीन हॅक करण्यात आले आहे.
मला वाटतं त्यांनी ईव्हीएम हॅक केले. हे जर खरे असेल तर त्यावर काही ही बोलण्याची गरज नाही. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्याचबरोबर विरोधकांना पराभूत करण्याचे षड्यंत्र रचल्याचा दावा करण्यात आला. राज्यातील विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करून समान संधीची परिस्थिती बिघडवली आहे. झारखंडच्या जनतेने ध्रुवीकरणाचे राजकारण नाकारले असून देशाला सकारात्मक संदेश दिला आहे, असेही प्रमुख विरोधी पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, "महाराष्ट्राचे निकाल अनपेक्षित आहेत. या निकालामागची खरी कारणे समजून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. आम्ही आमचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी, शाहूजी, फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे आम्ही खरे प्रतिक आहोत, लढा प्रदीर्घ आहे आणि जनतेचे प्रश्न मांडत राहू.
आम्ही जिंकलो किंवा पराभूत झालो तरी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहू, असे काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख पवन खेरा यांनी सांगितले. जिथे मुलांचे पेपर फुटतात, तिथे यंत्रांवर आणि निवडणूक प्रक्रियेवर आंधळेपणाने विश्वास ठेवता येत नाही. ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत आम्ही वारंवार बोललो आहोत. ईव्हीएमच्या ९९ टक्के चार्ज बॅटरीबाबत आम्ही प्रश्न विचारले, हरयाणात मतदानानंतर मतांची टक्केवारी वाढल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. पण काहीच उत्तर नव्हतं, मौन हे उत्तर आहे का?