कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये सोमवारी एक दु:खद घटना घडली आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच कुरुपा समुदाय संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते सी. के. रविचंद्रन (वय ६३) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. रविचंद्रन मुख्यमंत्री सिद्दारमय्या यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी त्यांना अचानक हार्ट अटॅक आला व ते हातात माईक असतानाच कुर्चीवरून कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने काँग्रेस पार्टी आणि स्थानिय समुदायात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रविचंद्रन यांना उपचारासाठी कनिंगहॅम रोडवरील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री सिद्दारमय्या यांनी सोशल मीडिया एक्सपर लिहिले की, राज्यपालांच्या अभियोजन आदेशाविरोधात कर्नाटक राज्य मागास वर्ग आणि अल्पसंख्याक असोसिएशनकडून बेंगळूरु प्रेस क्लब मध्ये एक पत्रकार परिषद घेताना असोसिएशनचे सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सी.के. रविचंद्रन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झक्क्याने निधन झाले आहे. त्यांनी लिहिले आहे की, संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत आमच्यासोबत राहिलेल्या रविचंद्रन यांच्या निधनाने मनाला खपू दु:ख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या दु:खाच्या वेळी मी त्यांचे कुटुंबीयांसोबत आहे,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ बेंगळुरू प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.
रविचंद्रन हे काँग्रेसच्या प्रचार समितीचे सदस्य होते. म्हैसूर जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात रविचंद्रन बेंगळुरु येथे प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमीन वाटपातील कथित घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला मंजुरी दिली आहे. याप्रकरणावरून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते सोमवारी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा मुख्यालयावर ठिय्या मांडला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनीही आंदोलने केली. दरम्यान राज्यपालांच्या आदेशाविरोधात सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा दिला असून पुढील आदेशापर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे.