
बंगळुरू -कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर एक आडवड्यानंतर आज २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. कर्नाटक सरकारमध्ये ३४ मंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह १० मंत्र्यांनी २० मे रोजी शपथ घेतली होती. तर आज अन्य २४ मंत्र्यांना सामील करून घेण्यात आले.
सिद्धारमय्यामंत्रिमंडळात केवळ एका महिलेला संधी देण्यात आली आहे. त्यांचे नावलक्ष्मी आर. हेब्बळकरआहे. त्यांनी बेळगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवारनागेश अन्नप्पा मनोळकर यांना पराभूत केले होते.वरिष्ठ आमदार एच के पाटील, कृष्ण बायरेगौडा, एन चेलुवरायस्वामी, के वेंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडरे आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडु राव आदि नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्याचबरोबर केएन राजन्ना, शरणबसप्पा दर्शनपुर, शिवानंद पाटील, रामप्पा बलप्पा तिम्मापू, एस एस मल्लिकार्जून, शिवराज संगप्पा तंगदागी, डॉ शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बलकर, रहीम खान, डी सुधाकर, संतोष लाड, एन एस बोसेराजू, सुरेश बीएस, माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांचा मुलगा मधु बंगारप्पा, डॉ. एमसी सुधाकर आणि बी नागेंद्र यांनाही मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी हेब्बलकर, मधु बंगारप्पा, डी. सुधाकर, चेलुवरायस्वामी, मंकुल वैद्य आणि एम. सी. सुधाकर यांना शिवकुमार यांचे निकटवर्तीय मानले जाते. सिद्धारमय्या आणि शिवकुमार मागील तीन दिवसांपासून दिल्लीत होते व त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पार्टी हायकमांडशी चर्चा केली होती.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटी (एआयसीसी) चे महासचिव केसी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांबरोबर सिद्धारमय्या व शिवकुमार यांची दीर्घ चर्चा झाल्यानंतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मंत्र्यांच्या सुचीवर शिक्कामोर्तब केले. मंत्रिमंडळात सर्व जातींना व प्रादेशिक नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सिद्धारमैयामंत्रिमंडळात खातेवाटप झाले आहे.न्यूज एजन्सीएएनआयनुसार, मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्याकडे अर्थ मंत्रालय राहणार आहे. उपमुख्यमंत्रीडीके शिवकुमारयांच्याकडे सिंचन विभाग व बंगळुरू सिटी डेव्हलपमेंट विभागमिळाला आहे.एचके पाटीलकायदा व मंत्रालयीन कामकाज मंत्री बनले आहे. त्याचबरोबरदिनेश गुंडू रावआरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तरकृष्ण बेयरे गौडा यांना महसूल मंत्रालय मिळाले आहे.
काँग्रेसचेराष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा वचित्तपूरचे आमदारप्रियांक खर्गे यांना ग्रामीण विकास व पंचायत राज विभागमिळाला आहे.के. जे. जॉर्जयांना ऊर्जा खाते मिळाले आहे.के. एच. मुनियप्पायांना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्रालय मिळाले आहे. रामालिंगा रेड्डीयांच्याकडे परिवहन खाते सोपवले आहे.
संबंधित बातम्या
