मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कर्नाटकमध्ये बंजारा समाज आक्रमक; येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज, पाहा VIDEO

कर्नाटकमध्ये बंजारा समाज आक्रमक; येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 27, 2023 08:58 PM IST

Reservation banjara bhovi communities : कर्नाटमध्ये बंजारा समाजआरक्षणाचा मुद्द्यावरून रस्त्यावर उतरला आहे.आज कर्नाटकच्या शिवमोगा भागात बंजारा समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले.

कर्नाटकमध्ये बंजारा समाज आक्रमक
कर्नाटकमध्ये बंजारा समाज आक्रमक

Karnataka reservation Issue : कर्नाटकमध्ये आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमवारी शिवमोगा जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या निवासस्थानावर व कार्यालयावर आंदोलनकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. शिकारीपुरा शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

कर्नाटमध्ये बंजारा समाजआरक्षणाचा मुद्द्यावरून रस्त्यावर उतरला आहे.आज कर्नाटकच्या शिवमोगा भागात बंजारा समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले.

 

का आक्रमक झाला आहे बंजारा समाज -
कर्नाटक राज्यात बंजारा समुदाय अनुसूचित जाती (SC)च्या आरक्षणाचा मुख्य लाभार्थी घटक आहे. मात्र राज्यातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने काही नव्या घोषणा करत सर्व प्रवर्गांना संभ्रमात टाकले आहे. बंजारा समाजातील लोकांच्या आरक्षणात कपात केल्याचा मुद्दा तापला आहे. सदाशिव आयोगाच्या रिपोर्टनुसार सरकारकडून घोषित राज्यातील आरक्षणात अनुसूचित जाती घटकांतर्गत विविध उप-जातींना विशेष कोटा दिला आहे. आंदोलन कर्त्यांचा आरोप आहे की, 'अनुसूचित जाती' तील एका वर्गाला कमीआरक्षण दिले गेले, ज्याच्याशी बंजारा समाजाचा संबंध आहे.

बंजारा आरक्षणावर बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, सदाशिव अहवालासंदर्भात आंदोलकांमध्ये काही गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासंदर्भात मी लवकरच बंजारा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या ५० वर्षांपासून शिकारीपुरा भागाचे नेतृत्व करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग