दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, बलात्काराचा आरोप
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, बलात्काराचा आरोप

दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, बलात्काराचा आरोप

Feb 29, 2024 06:01 PM IST

Uttar Pradesh Kanpur Girls Found Dead: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबांकडून करण्यात येत आहे.

Crime
Crime (PTI)

Two Minor Girls Found Hanging In Uttar Pradesh: उत्तर प्रदेश कानपूरच्या घाटमपूर भागात बुधवारी रात्री दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी तीन जणांनी या मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप केल्याचा त्यांच्या कुटुंबाने आरोप आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश कानपूरच्या घाटमपूर भागात बुधवारी सायंकाळी या मुलींना शेवटचे पाहण्यात आले. मात्र, त्या रात्री उशीर होऊनही घरी परतल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाटमपूर भागात बुधवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आलाय

रामरूप निषाद (वय, ४८), त्याचा मुलगा राजू (वय, १८) आणि पुतण्या संजय (वय, १९) यांच्यासह तिघे आरोपी मुलींचा व्हिडिओ बनवून त्यांना धमकावत होते, असा आरोप मृत मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे.

अतिरिक्त सीपी हरीश चंद्र यांनी सांगितले की, ब्लॅकमेलिंगमुळे मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तिन्ही आरोपींच्या मोबाइलमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे फोटो सापडले. याप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले तिघेही मृत मुलींचे दूरचे नातेवाईक आहेत. मुलींना मारहाण आणि लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, असे चंद्रा यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये टेम्पो व ट्रकचा भीषण अपघात, महाराष्ट्रातील ४ मजूर ठार

डोहाळे जेवणातून परतणाऱ्या पाहुण्यांच्या व्हॅनला भीषण अपघात

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांच्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर