मोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली

मोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली

Jun 06, 2024 09:03 PM IST

Kangana Ranaut Slapped : मंडीमधील भाजपची खासदार व अभिनेत्री कंगना रणौतला चंडीगड विमानतळावर CISF महिला जवानाने कानाखाली मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. आरोपी महिला जवानला ताब्यात घेण्यात आले आहे.

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण

Kangana Ranaut Slapped By Security Staff : चंडीगड विमानतळावर भाजपची खासदार व अभिनेत्री कंगना रणौतला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाकडून (Kangana Ranaut) दाखल तक्रारीनुसार दिल्लीला जाण्यासाठी ती चंडीगड एयरपोर्टवर पोहोचली होती. सिक्योरिटी चेक इन नंतर जेव्हा ती बोर्डिंगसाठी जात होती. त्यावेळी एलसीटी कुलविंदर कौर (CISF यूनिट चंडीगड एअरपोर्ट ) या महिला जवानाने तिच्या कानाखाली लगावली. त्यानंतर कंगना रणौतसोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुर या व्यक्तीने कुलविंदर कौर यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. आरोपी CISF महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कंगना रणौत दिल्लीत दाखल झाली आहे व तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महानिदेशक नीना सिंह यांना या घटनेविषयी माहिती दिली. कंगनाने दावा केला होता की, चंडीगड एअरपोर्टवर कर्टन परिसरात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्याशी वाद झाला व त्यांनी थप्पड मारली. कुलविंदर यांना सीओ कक्षात ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केली जात आहे. चंडीगड एअरपोर्टवर सीआईएसएफ द्वारे सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.

कंगना रणौत तिच्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून निघाली होती. खासदार झाल्यानंतर तिला आपल्या पहिल्याच प्रवासात कानाखाली खावी लागली आहे.कंगनाने हिमाचलमधील मंडी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

महिला कॉन्स्टेबलनेकंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर अभिनेत्रीने याचातक्रार विमानतळ पोलिसांकडेकेली आहे. त्याचबरोबर या महिला जवानाला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारासकंगना विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून बाहेर पडत असताना महिला जवानाने तिच्यावर हात उचलला आणि कानाखाली लगावली. कंगनाने याबाबत तक्रारही केली आहे. कंगनाच्या कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाला विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे. तिला कमांडंटच्या खोलीत बसवून ठेवले आहे.त्यानंतर कंगना दिल्लीकडे रवाना झाली.

दिल्लीत भाजप खासदारांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी कंगना चंदीगड विमानतळावून दिल्लीला जात होती. या घटनेनंतर विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट युके ७०७ ने कंगना दिल्लीत पोहोचली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर