मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kangana ranaut : १०० रुपयांसाठी कंगनाने कानाखाली खाल्ली, CISF महिला जवान म्हणाली..

Kangana ranaut : १०० रुपयांसाठी कंगनाने कानाखाली खाल्ली, CISF महिला जवान म्हणाली..

Jun 07, 2024 12:10 AM IST

Kanganaranautslap : कंगना रणौतला कानाखाली लगावल्यावर CISF कर्मचारी कुलविंदर कौर हिने सांगितले की, कंगनाने वक्तव्य केले होते की, शेतकरी १०० रुपयांसाठी तेथे बसले आहेत. काय ती तेथे जाऊन बसेल?

कंगनाला का मारले महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने सांगितले
कंगनाला का मारले महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने सांगितले

Kangana Ranaut slap News : चंडीगड एरपोर्टवर बॉलीवूड अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौतला (Kangana ranaut ) महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड लगावली. महिला जवान कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्यावर नाराज होती. महिलेने सांगितले की, तिची आईही शेतकरी आंदोलनात प्रदर्शन करत होती. कंगना रणौतला कानाखाली लगावल्यावर  CISF  कर्मचारी कुलविंदर कौर हिने सांगितले की, कंगनाने वक्तव्य केले होते की, शेतकरी १०० रुपयांसाठी तेथे बसले आहेत. काय ती तेथे जाऊन बसेल? माझी आई तेथे बसली होती व सरकारी धोरणाचा विरोध करत होती. दरम्यान कंगनाला कानाखाली मारल्यानंतर कुलविंदर कौरला निलंबित केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महिला कर्मचाऱ्याविरोधात FIR - 
एका वरिष्ठ सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला कॉन्स्टेबल विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर तिला नोकरीतून निलंबित केले आहे. चंडीगड एअरपोर्टवर कंगना विमानात चढण्यापूर्वी विमानतळावर सुरक्षा तपासणीवेळी सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्याने अभिनेत्रीला थप्पड लगावली. कंगनाने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ती दिल्लीला जात असताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीवेळी सीआयएसएफ महिलेने तिला थप्पड मारली व शिवीगाळ केली. कंगनाने 'पंजाबमध्ये दहशत आणि हिंसाचारात वाढ' असे म्हणत पोस्ट केली आहे.

मोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली
दरम्यान महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिची भाऊ शेर सिंह माहीवाल, जो स्थानिक शेतकरी नेता आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना माध्यमातून ही घटना समजली. कंगना रणौतला थप्पड मारणारी त्यांची लहान बहीण कुलविंदर कौर आहे. तिचा विवाह सहा वर्षापूर्वी जम्मूमधील सिमरन सिंह यांच्याशी झाला आहे. तिला १ मुलगा व १ मुलगी आहे. गेल्या दोन वर्षापासून कुलविंदर कौर चंडीगड विमानतळावर तैनात आहे. कुलविंदरचा पतीही सीआयएसएफमध्ये नोकरी करतो. 

शेर सिंह माहीवाल यांनी सांगितले की, कुलविंदर कौर ड्यूटी करताना कंगना रणौतची पर्स व फोनचे स्कॅनर चेकिंग करताना तिच्याशी वाद झाला. कंगना म्हणाली की ती मंडीची खासदार आहे. त्यावर कुलविंदर कौरने उत्तर दिले मी तुला ओळखत नाही. त्यानंतर वाद वाढत गेले व तिने कंगनाच्या कानाखाली लगावली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग