मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kangana Ranaut : ‘जर मला ही संधी मिळाली असती..', अभिनेत्री खासदार कंगना रणौतने सांगितले ‘अग्निवीर’चे फायदे

Kangana Ranaut : ‘जर मला ही संधी मिळाली असती..', अभिनेत्री खासदार कंगना रणौतने सांगितले ‘अग्निवीर’चे फायदे

Jul 04, 2024 09:13 PM IST

Kangana Ranaut : अग्निवीर योजनेला पाठिंबा दर्शवत अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौतने बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना स्वत:ला घडवण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण सांगितली.

अभिनेत्री खासदार कंगना रणौतने सांगितले ‘अग्निवीर’चे फायदे
अभिनेत्री खासदार कंगना रणौतने सांगितले ‘अग्निवीर’चे फायदे

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिनदास्त अंदाजासाठी ओळखली जाते. अनेक मुद्यांवर ती आपले मत व्यक्त करत आहेत. आता ती मंडी लोकसभा मतदारसंघातून ती खासदार बनली आहे. शेतकरी आंदोलनावर टिप्पणी केल्यामुळे महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लगावली होती. आता कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट  करत वादग्रस्त ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेचे समर्थन केले आहे.'

अग्निवीर योजनेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ते राजकारणी कंगना रणौतने या योजनेचे समर्थन केले असून, लष्करात अल्प कालावधीसाठीही सेवा केल्याने प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य सुधारण्यास मदत होणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. 

खासदार कंगना रणौतने एक्सवर पोस्ट करत म्हटले की,  "पूर्णपणे सहमत आहे, मीदेखील एका छोट्या गावातून आले आहे, आत्मविश्वास आणि सादरीकरणाचा अभाव हे ग्रामीण भागातून/ सरकारी हिंदी माध्यमाच्या शाळांमधून आलेल्या आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पोस्टमध्ये म्हटले की, "थोड्या काळासाठी देखील सैन्यात सेवा केल्याने केवळ आपण घडतच नाही तर शिष्टाचार, शिस्त आणि सैनिक होण्याची संधीसह एक व्यक्तिमत्व व चारित्र्याचा विकास होतो. राष्ट्रीयत्वाची भावना व सर्वसमावेशक जीवन मूल्यांचा विकास होतो. भविष्यात जग जिंकण्यासाठी आणखी काय हवं?"

"आणि या सगळ्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला पैसे मिळतात, कल्पना करा!! जर, मला मोठे होताना शी संधी मिळाली असती तर!! सैनिक होण्यासाठी मला मानसिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या स्वत:ला प्रशिक्षित करावं लागलं. त्यासाठी मी अनेक  क्लासेस लावले,  जिम जॉईन केले. रामकृष्ण मिशन मठात जात होते. रोज रोजीरोटी आणि निवाऱ्यासाठी घडपडत असे. विचार करा, असे म्हणत तिने शेवटी #AgniveerScheme असा हॅशटॅग दिला आहे.

या पोस्टबद्दल काही जण तिचे कौतुक करत आहेत तर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने कंगनाला प्रश्न विचारला की, "आणि ४  वर्षांनंतर तुम्ही आमच्या तथाकथित सैनिकांना तुमच्या घराच्या गेटवर गार्ड म्हणून ठेवणार आहात?"

त्यावर उत्तर देताना अभिनेत्री  म्हणाला की, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या सरकारी सुरक्षा दलांमध्ये त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि खाजगी रक्षक असण्यात गैर काय आहे? ते सन्मानाने आणि प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करतात, केवळ आपल्याला ते अनावश्यक वाटतात म्हणून त्यांचा अपमान करणे थांबवा.

जर आज विद्यापीठातील टॉपर्स रस्त्यावर डोसा किंवा बिर्याणी विकून हळूहळू गुणवत्तेवर आपला व्यवसाय वाढवून दरमहा कोट्यवधी कमावू शकतात तर कोणतीही नोकरी छोटी नसते, ते तुमच्या क्षमतेवरही अवलंबून असते, या लोकसंख्येच्या देशात स्पर्धेसाठीही तयार राहावे लागते, होय प्रायव्हेट गार्ड असणे किंवा स्वतःची सिक्युरिटी कंपनी सुरू करणे हादेखील एक पर्याय आहे आणि तो एक उत्तम पर्याय आहे,  असे ती म्हणाली. 

काय आहे अग्निवीर योजना?

जून २०२२ मध्ये, भारताने सशस्त्र दलांचे वय कमी करण्यासाठी, तंदुरुस्त सैन्य सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम तांत्रिकदृष्ट्या कुशल युद्ध-लढाऊ दल तयार करण्यासाठी पारंपरिक भरती प्रणालीऐवजी अग्निपथ उर्फ अग्निवीर योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे पुढील पाच ते सहा वर्षांत सैन्यदलातील जवानांचे सरासरी वय ३२ वर्षांवरून २४ ते २६ वर्षांवर येण्याची शक्यता आहे.

यात चार वर्षांसाठी सैनिकांची भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यातील २५ टक्के सैनिकांना पुढील तपासणीनंतर आणखी १५ वर्षे नियमित सेवेत कायम ठेवण्याची तरतूद आहे. या घोषणेला राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर