स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभमध्ये साध्वी बनून करणार दोन आठवड्यांची तपश्चर्या; काय आहे कल्पवास?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभमध्ये साध्वी बनून करणार दोन आठवड्यांची तपश्चर्या; काय आहे कल्पवास?

स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभमध्ये साध्वी बनून करणार दोन आठवड्यांची तपश्चर्या; काय आहे कल्पवास?

Jan 11, 2025 06:41 PM IST

prayagraj kumbh mela 2025 : दिवंगत स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल प्रयागराज महाकुंभात दोन आठवडे साध्वी बनून तप करणार आहे. निरंजनी आखाड्यात त्या कल्पवास करणार आहेत. कल्पवास म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे नियम आणि महत्त्व...

स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभमध्ये साध्वी बनून राहणार
स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभमध्ये साध्वी बनून राहणार

prayagraj kumbh mela 2025 : अ‍ॅपलचे दिवंगत सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. पॉवेल साध्वी बनून दर १२ वर्षांनी भरणाऱ्या या पवित्र महाकुंभात दोन आठवडे ध्यान धारणा करतील. कल्पवासमध्ये ती वेळ घालवणार आहे. कल्पवास ही फार जुनी हिंदू परंपरा आहे, जी महाकुंभासारख्या महामेळ्यात अधिक महत्त्वाची ठरते. वेद आणि पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे.

 पॉवेल निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी कैलासानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत. त्यांनी विविध विधींमध्ये भाग घेणे आणि संगमावर पवित्र स्नान करणे अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना महाकुंभाचे आध्यात्मिक सार पूर्णपणे आत्मसात करता येईल. त्यांचा मुक्काम २९ जानेवारीपर्यंत असणार आहे.

काय असतो कल्पवास ?

कल्पवास केल्याने आपल्या इच्छेचे फळ मिळते, असे म्हटले जाते. यामुळे जन्मानंतरच्या बंधनातून मुक्ती मिळते. संगमावरील संपूर्ण माघ महिन्यातील साधनेला कल्पवास म्हणतात. महाभारतानुसार काहीही खाऊ-पिऊन ९ वर्षे तपश्चर्या करण्याचे फळ माघ महिन्याच्या कल्पवासाच्या फळाच्या बरोबरीचे असते. शास्त्रानुसार कल्पवासचा कमीत कमी कालावधी एक रात्र असू शकतो आणि बरेच लोक तीन रात्री, तीन महिने, सहा महिने, १२ वर्षे आणि आयुष्यभर कल्पवास करतात.

कल्पवासाचे नियम काय आहेत?

कल्पवास करणे सोपी गोष्ट नाही. कल्पवासाच्या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते - ज्यात सत्य बोलणे, अहिंसा, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा दाखवणे, ब्रह्मचर्य पाळणे, सर्व व्यसनांचा त्याग, ब्रह्म मुहूर्तात उठणे, पवित्र नदीत दररोज तीन वेळा स्नान करणे, पितरांचे पिंडदान, दान, नामजप, विचारक्षेत्राबाहेर न येणे, कोणाचीही निंदा न करणे, साधूंची सेवा करणे,  एक वेळचे जेवण, जमिनीवर झोपणे, अग्नी ग्रहण करणे आणि शेवटी देवाची आराधना करणे.

दर बारा वर्षांनी होणारा महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. जगभरातून लाखो भाविक, संत आणि साधक येथे भेट देतात. संगमाच्या पाण्यात डुबकी मारल्याने पाप धुतले जातात आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. यंदा लाखो भाविक महाकुंभाला भेट देतील, असा अंदाज आहे. पौराणिक मान्यतेनुसार देव आणि असुर यांच्यात समुद्रमंथन झाले होते. मंथनादरम्यान विष आणि अमृतही बाहेर पडले. असे मानले जाते की अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार भागांवर पडले. यानंतर ही ठिकाणे पवित्र झाली. या ठिकाणी दर १२ वर्षांनी महाकुंभाचे आयोजन केले जाते. ही चार ठिकाणी म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर