झारखंड राज्याचेमुख्यमंत्री हेमंत सोरेनयांच्याविरुद्ध सक्तवसुली संचलनालय(ईडी) कडून कारवाईची शक्यता गृहित धरूनझामुमो-काँग्रेस-राजदआघाडीच्यासरकारनेपर्याय शोधण्यास तयारी केली आहे.जमीन घोटाळा प्रकरणातईडीने झारखंडचेमुख्यमंत्रीतसेच झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो)चे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेनयांना चौकशीसाठी सहावेळी समन्स बजावले आहे. मात्रहेमंत सोरेन ईडीच्याकार्यालयात गेले नाहीत. त्यानंतर सातव्यांदा समन्स बजावून २९ डिसेंबर रोजी सोरेन यांना ईडीने विचारले की, चौकशीसाठी कधी व कोठे उपलब्ध होणार ते सांगा.
ईडीने सोरेन यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र सोरेन यांच्याकडून ईडीला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. दरम्यान गिरिडीह जिल्ह्यातील गांडेय विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. सर्फराज अहमद यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. झारखंड विधानसभा सचिवालयाने सोमवारी (१ जानेवारी २०२४) रोजी याची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर चर्चाआहे की, ईडीच्या कोणत्याही कारवाईचा सामना करण्यासाठी हेमंत सोरेन तयार आहेत. त्याचबरोबर सरकार त्यांना पर्यायही शोधत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारहेमंत सोरेनयांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. त्या गांडेय मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतात. यामुळेच गांडेय विधानसभा जागेवरून डॉ. सर्फराज अहमद यांनी राजीनामा दिला आहे.
जमीन घोटाळा प्रकरणी जर ईडी किंवा राजभवनातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली गेली तर कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत कल्पना सोरेनया विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. कल्पना सोरेन यांच्याबरोबरच जोबा मांझी, चंपई सोरेन आणि सविता महतो यांनाही हेमंत सोरेन यांना पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र याबाबतचा पुढील घटनाक्रम हा ईडीकडून हेमंत सोरेन यांच्या होणाऱ्या चौकशीवर आणि पुढील कारवाईवर अवलंबून असेल.