ज्योती मल्होत्राने दिली कबुली, पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक अधिकाऱ्याच्या होती संपर्कात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ज्योती मल्होत्राने दिली कबुली, पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक अधिकाऱ्याच्या होती संपर्कात

ज्योती मल्होत्राने दिली कबुली, पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक अधिकाऱ्याच्या होती संपर्कात

HT Marathi Desk HT Marathi
Published May 21, 2025 11:54 AM IST

हिसार पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या दरम्यान तिने दानिशशी थेट संवाद साधल्याची कबुली दिली.

Hisar-based Jyoti Malhotra, who ran the YouTube channel 'Travel with JO', was arrested from the New Aggarsain Extension.
Hisar-based Jyoti Malhotra, who ran the YouTube channel 'Travel with JO', was arrested from the New Aggarsain Extension. (YouTube/TravelWithJo)

युट्यूबर ज्योती मल्होत्राने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्होत्राने चौकशीदरम्यान कबूल केले की, नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत ती पाकिस्तानी नागरिक आणि उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिशच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की दानिश मल्होत्राला गुप्तचर मालमत्ता म्हणून विकसित करण्यासाठी सक्रियपणे काम करत होता.

या दरम्यान दानिशशी थेट संवाद झाल्याची कबुली तिने दिली, असे कुमार यांनी सांगितले. ती इतर ही अनेक युट्युब इन्फ्लुएंसर्सच्या संपर्कात होती. हरियाणा शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे (HSGMC) आयटी प्रभारी हरकीरत सिंग यांचे तीन मोबाइल फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी (PIOs) संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. तिचे संबंध आणि संवाद आता व्यापक तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

हिसार पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "तिची अनेक बँक खाती आहेत आणि अनेक व्यवहार झाले आहेत. आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण करण्यास वेळ लागेल.

गुप्तहेरांचे जाळे?

तपासकर्ते मल्होत्राच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल हिस्ट्रीचीही तपासणी करत आहेत. २०२८ पर्यंत वैध असलेला तिचा पासपोर्ट २०१८ मध्ये मिळाला असून तिने पाकिस्तान, चीन, दुबई, थायलंड, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.

मल्होत्रा यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलिस करत असून, पुढील चौकशीसाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे.

गेल्या दोन आठवड्यांत पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या १२ जणांमध्ये ज्योतीचाही समावेश असून, उत्तर भारतात पाकिस्तानशी संबंधित कथित गुप्तहेर नेटवर्क कार्यरत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर