कॅनडाच्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांचा पराभव होणार! ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांचं भाकीत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कॅनडाच्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांचा पराभव होणार! ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांचं भाकीत

कॅनडाच्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांचा पराभव होणार! ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांचं भाकीत

Nov 08, 2024 09:03 AM IST

Canada elections : कॅनडातील आगामी निवडणुकीत ट्रुडो यांचा पराभव होईल असे भाकीत ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांनी वर्तवलं आहे.

कॅनडा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार जस्टिन ट्रुडो यांचा पराभव! ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांचं भाकीत
कॅनडा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार जस्टिन ट्रुडो यांचा पराभव! ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार इलॉन मस्क यांचं भाकीत

Canada elections : अब्जाधीश एलन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. आगामी निवडणुकीत ट्रुडो पराभूत होतील, असा मस्क यांनी  दावा केला आहे.  अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारातही मोठी भूमिका बजावली होती. ट्रम्प यांनीही आपल्या पहिल्या भाषणात मस्क यांचा  अनेकदा उल्लेख केला होता.

नुकतेच एका युजरने मस्क यांना सोशल मीडिया पोस्टमध्ये टॅग केलं होतं. यात  ट्रुडो यांच्या पासून आमची सुटका करा! आम्हाल मस्क यांना तुमच्या मदतीची गरज आहे, असे या युझरने लिहिले होते. त्या पोस्टवर उत्तर देतांना  मस्क म्हणाले की, जस्टिन ट्रुडो आगामी निवडणुकीत पराभूत होतील. विशेष म्हणजे डिसेंबर २०२५ पूर्वी कॅनडातही निवडणुका होणार आहे. सध्या ट्रुडो यांना त्यांच्याच लिबरल पक्षात विरोधाचा सामना करावा लागत आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जस्टिन ट्रुडो यांनी भारतासोबतचे संबंध दाव्यावर लावले आहेत. 

यापूर्वी मस्क यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ शुल्झ यांना 'मूर्ख' म्हटलं होते. 'फ्री डेमोक्रॅट्स' या व्यावसायीकांचे समर्थक असलेला पक्षाचे ख्रिश्चन लिंडनर यांना अर्थमंत्रीपदावरून हटवल्यानंतर जर्मनीतील आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी गुरुवारी अल्पमतातील सरकारसह देशाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले.

पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत त्यांचे 'सोशल डेमोक्रॅट्स' आणि 'ग्रीन' पक्ष अल्पमतातील सरकारमध्ये सहभागी होतील, असे ते  म्हणाले. संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी गटाचे नेते ख्रिश्चन डेमोक्रॅट्सचे फ्रेडरिक मर्झ यांनी मात्र अविश्वास ठराव आणि मतदानाची मागणी केली आहे. 

कॅनडातील आगामी निवडणुकीत ट्रुडो यांना अनेक प्रमुख पक्षांचा सामना करावा लागणार आहे. यात विरोधी पक्षनेते पियरे पॉलीविअर यांचा कन्झर्व्हेटिव्ह पक्ष आणि जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील एनडीपी म्हणजेच न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा समावेश आहे. ट्रुडो यांना पदावरून हटवण्यासाठी लिबरल पक्षाच्या अनेक खासदारांनी याचिकेवर स्वाक्षरी केल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. ट्रुडो मात्र लिबरल पक्षाच्या निवडणुका स्वत:च्या नेतृत्वाखाली लढवण्यावर ठाम आहेत.  

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर