मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  hyderabad News : पत्नीसोबत किरकोळ भांडण; न्यायाधीशाने उचललले टोकाचे पाऊल

hyderabad News : पत्नीसोबत किरकोळ भांडण; न्यायाधीशाने उचललले टोकाचे पाऊल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 25, 2024 01:15 PM IST

hyderabad News : पत्नीसोबत झालेल्या किरकोळ (judge committed suicide) भांडणातून हैदराबादमधील एका उत्पादन शुल्क न्यायाधीशाने टोकाचे पाऊल उचलले.

 पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून हैदराबादमधील एका उत्पादन शुल्क न्यायाधीशाने टोकाचे पाऊल उचलले.
पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून हैदराबादमधील एका उत्पादन शुल्क न्यायाधीशाने टोकाचे पाऊल उचलले.

hyderabad News : पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून हैदराबादमधील एका उत्पादन शुल्क न्यायाधीशाने टोकाचे पाऊल उचलले. या न्यायाधीशाने थेट गळफास लावून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या न्यायाधीशाचे नाव ए. माणिकांत असे असून, त्यांचे वय ३६ वर्षे आहे. हैद्राबादमधील राहत्या घरी त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

Suicide Prevention: थांबा, आत्महत्येचा विचार करत असाल तर या गोष्टी आधी करा!

याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी मृत न्यायाधीशाच्या वडिलांच्या तक्रारीवरून अंबरपेठ पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार माणिकांत हे अबकारी प्रकरणाचे प्रथमवर्ग न्यायाधीश होते. रविवारी दुपारी मणिकांत यांचा पत्नीसोबत वाद झाला. त्यांच्या बेडरूम मधून येणारा आवाज ऐकून घरातील लोक बेडरूमकडे धावले असता, त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. पोलिसांनी याप्रकरणी सीआरपीसी कलम १७४ अन्वये संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील बदायूंमध्येदेखील अशीच एक घटना घडली होती. येथील दिवाणी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश ज्योत्स्ना राय यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याची सुसाईड नोटही सापडली आहे. प्रत्यक्षात ती वेळेवर कोर्टात पोहोचली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला.

फोन आला नसतानाही लोकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन तपासणी केली. त्याची बेडरूम बंद होती. दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बदायूंपूर्वी त्या अयोध्येत न्यायदंडाधिकारी होत्या. त्या डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग