मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttar Pradesh: मंत्र्याला विकासकामांबद्दल प्रश्न विचारला म्हणून यु-ट्युबरला अटक

Uttar Pradesh: मंत्र्याला विकासकामांबद्दल प्रश्न विचारला म्हणून यु-ट्युबरला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 15, 2023 11:20 AM IST

Uttar Pradesh News : उत्तरप्रदेशचे माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवी यांना विकास कामांबद्दल प्रश्न विचार विचारला म्हणून एका युट्युबरला अटक करण्यात आली होती.

Uttar Pradesh
Uttar Pradesh

Uttar Pradesh News: विकास कामांबद्दल उत्तर प्रदेशच्या मंत्र्याला प्रश्न विचारला म्हणून एका युट्युबरला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या संभल येथे एका कार्यक्रमादरम्यान युट्युबरने राज्याचे माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवी यांना विकास कामांबद्दल काही प्रश्न विचारले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्या शुभमच्या तक्रारीवरून युट्युबरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी कलम १५१ अंतर्गत युट्युबरला अटक केली. त्यानंतर चंदौसी उपजिल्हा दंडाधिकारी न्यायालयातून युट्युबरला जामीन मिळालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब देवी यांचा दोन दिवसांपूर्वी दौसी विधानसभा मतदारसंघातील बुद्ध नगर खंडवा गावात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संजय राणा नावाच्या युट्युबरने गुलाब देवी यांना निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यामुळे मंत्री गुलाब देवी पत्रकारावर चांगल्याच संतापल्या. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेच्या काही तासांनंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शुभम राघव यांनी युट्यूबर संजय राणा यांच्या विरोधात चंदौसी पोलीस ठाण्यात कलम ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी संजय राणाला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर चंदौसी उपजिल्हा दंडाधिकारी न्यायालयातून संजय राणाला जामीन मिळाला आहे.

WhatsApp channel

विभाग