राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय मुलाने ८ वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना लुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनातून आरोपीने हा गुन्हा केला आहे. आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एडीसीपी लभूराम करीत आहेत.
लुणी पोलिस ठाण्याचे अधिकारी हुकम सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईने मुलीसोबत शेजारी राहणाऱ्या मुलाने गैरवर्तन केल्याची तक्रार दिली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली होती. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतरही तीन दिवस भीतीपोटी आणि समाजात अब्रु जाईल यामुळे कुटुंबीयांनी घटनेची कोणालाही माहिती दिली नाही, मात्र मुलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यानंतर चिमुकल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या घटनेची नोंद होताच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन आहे. घटनेपूर्वी त्याने व्हिडिओ पाहिले होते. सतत असे व्हिडिओ पाहण्याची सवय असल्याने त्याने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सामान्यत: अश्लील व्हिडिओ पाहून माणूस मानसिकरित्या नैैराश्यात जातो व त्याच्याकडून अशा प्रकारचे गुनहे होतात.
पत्नी बाहेर जाताच वडिलांनी घाणेरडे कृत्य केले आणि अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केला. घरी परतल्यानंतर मुलींनी आपल्या घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालील जमीन सरकली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलींना वैद्यकीय तपासासाठी पाठवले आहे.
महिलेने १६ वर्षांची मोठी मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा घरात पतीजवळ ठेऊन ती माहेरी गेली होती.पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हस्तिनापूर परिसरातील एका गावातील ही घटना आहे. महिलेने गुरुवारी आपल्या दुसऱ्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.