मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  10th Pass Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वे आणि बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

10th Pass Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वे आणि बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 03, 2024 02:04 PM IST

Railway And Bank Jobs: दहावी उतीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रेल्वे आणि बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Jobs 2024
Jobs 2024 (HT)

Railway And Bank Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता दहावी उतीर्णांसाठी रेल्वे आणि बँकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे दहावी उतीर्ण उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जबलपूर येथील रेल्वेत पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगारांची आवश्यकता आहे, या पदाला सब स्टाफ असे म्हणतात. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. डिसेंबर महिन्याच्या २० तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. तर, करण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२४ आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४८४ पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदासाठी दहावी उतीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारही अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या www.centralbankofindia.co.in वर भेट देऊ शकतात.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेद्वारे शिकाऊ पदासाठी भरती सुरू झाली. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी अनुभवी उमेदवारही अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत ३ हजार १५ रिक्त पदांची भरती केली जाते. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०२४ आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात.

WhatsApp channel