IAF Agniveer Bharti 2025 : भारतीय हवाईदलात भरती होण्याची संधी चालून आली आहे. अग्निवीर अंतर्गत अग्निवीरवायू भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या साठी ऑनलाइन अर्ज आज ७ जानेवारीपासून स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २७ जानेवारीपर्यंत हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईट vayu.agnipath.cdac.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे वायुसेनेच्या अग्निवीरवायू भरतीसाठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे.
अविवाहित पुरुष आणि महिला दोघेही अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज करू शकतात. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती चार वर्षांसाठी केली जाणार आहे. या भरतीतून निवडणण्यात आलेल्या २५ टक्के उमेदवारांना कायमस्वरूपी हवाई दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ दरम्यान झालेला असावा. म्हणजे वय १७ ते २१ वर्षे असावे.
विज्ञान शाखा, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह ५० टक्के गुणांसह १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याना ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असावेत.
उंची- अग्निवीरवायूसाठी पुरुष उमेदवारांची उंची १५२ सेमी असावी. महिला उमेदवारांसाठी किमान स्वीकार्य उंची १५२ सेमी आहे. ईशान्य किंवा उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील उमेदवारांसाठी, किमान १४७ सेमी उंची स्वीकारली जाईल. लक्षद्वीपमधील उमेदवारांच्या बाबतीत, किमान उंची १५० सेमी ग्राह्य धरली जाणार आहे.
छाती : पुरुष उमेदवारांची छाती ७७ सेमी विना फुगवलेली तर फुगवून आणखी ५ सेमी असणे आवश्यक आहे. सामान्य स्थितीत मुलींच्या छातीचा आकार कितीही असला तरी तो कमीतकमी ५ सेमीने फुगवता यायला हवा
१.६ किमी धावणे : पुरुषांना ७ मिनिटांत आणि महिलांना ८ मिनिटांत हे आंतर धावून पूर्ण करावे लागणार आहे.
या सोबत पुरुषांना १ मिनिटात १० पुशअप्स काढावे लागणार आहे. तर पुरुषांसाठी १ मिनिटात १० सीटअप आणि महिलांसाठी १ मिनिट ३० सेकंदात १० सीटअप काढावे लागणार आहे.
यानंतर आणखी १ मिनिटात २० सिट-अप पुरुषांना काढावे लागणार आहे. तर महिलांना एका मिनिटात १५ सिट-अप काढावे लागणार आहे.
-अग्निपथ योजनेअंतर्गत ही भरती केली जात आहे.
-निवडलेल्या उमेदवारांची ४ वर्षांच्या सेवेसाठी भरती केली जाईल.
- सेवा पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के उमेदरांना हवाई दलात कायमस्वरूपी सामावून घेतले जाईल.
-हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, vayu.agnipath.cdac.in.
-नोंदणी करा आणि अर्ज भरा.
- सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी जमा करा.
- फॉर्म सबमिट करा आणि पावतीची प्रिंटआउट घ्या.
ज्या तरुणांना देशसेवा करत करिअर घडवायचे आहे त्यांच्यासाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
संबंधित बातम्या