JioPhone Next Offer: जुन्या 4G फोनच्या बदल्यात मिळवा जिओफोन नेक्स्ट ४,४९९ मध्ये
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JioPhone Next Offer: जुन्या 4G फोनच्या बदल्यात मिळवा जिओफोन नेक्स्ट ४,४९९ मध्ये

JioPhone Next Offer: जुन्या 4G फोनच्या बदल्यात मिळवा जिओफोन नेक्स्ट ४,४९९ मध्ये

May 17, 2022 10:31 PM IST

अल्पावधीत सर्वांच्या पसंतीला उतरलेला जिओफोन नेक्स्ट आता एक्सचेंज ऑफर द्वारे तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चालू स्थितीतील कोणत्याही जुन्या4G फोनच्या बदल्यात जिओफोन नेक्स्ट रु.४४९९ मध्ये घेता येईल.

<p>जिओफोन नेक्स्ट</p>
<p>जिओफोन नेक्स्ट</p>

JioPhone Nextमागील वर्षीनोव्हेंबर २०२१ मध्ये लाँच केला होता. जिओने हास्मार्टफोन१० हजार रुपयांहून कमी किंमतीतएंट्री-लेवल यूजर्ससाठी लाँच केला होता. स्वस्तातील हा४जीहँडसेट खूप प्रसिद्ध झाला होता. आता हा स्मार्टफोन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठीReliance Jioनेया फोनवर नव्या ऑफरची घोषणा केली आहे.

जिओ फोन नेक्स्ट२,००० रुपयांच्या डिस्काउंटने खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन६,४९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता.आता हा स्मार्टफोन ४,४९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो.जर तुम्ही पहिल्यादांच हास्मार्टफोन खरेदी करणार असाल किंवा एक सेकंडरी बजेट फोनघेणार असाल तर ही चांगली संधी आहे. जाणून घ्याJio Phone Nextवर मिळणाऱ्याऑफर्सव या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये..

रिलायन्स जिओ आणि गुगलने एकत्रितपणे संशोधन करून जिओफोन नेक्स्ट हा अतिशय परवडणारा स्मार्टफोन सादर केला होता. अल्पावधीत सर्वांच्या पसंतीला उतरलेला जिओफोन नेक्स्ट आता एक्सचेंज ऑफर द्वारे तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चालू स्थितीतील कोणत्याही जुन्या४G फोनच्या बदल्यात जिओफोन नेक्स्ट रु. ४४९९ मध्ये घेता येईल.

हा फोन गुगल च्या नवीन प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. जिओफोन नेक्स्ट७००० रुपयांच्या आतील सेगमेंटमधील सर्वोत्तम पर्याय आहे.

<p>JioPhone Next Offer</p>
JioPhone Next Offer

या फोनमध्ये असे अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत जे जिओफोन ला इतरांपासून वेगळे करतात. जिओफोन नेक्स्टच्या कॅमेरामध्ये इनबिल्ट स्नॅपचॅट आणि ट्रान्सलेट फीचर आहे. ट्रान्सलेशन फीचरच्या माध्यमातून कोणत्याही भाषेतील मजकुराचा फोटो काढून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकता आणि ते ऐकूही शकता. तसेच,फोनच्या कॅमेऱ्यात किती फोटो काढता येतील किंवा स्टोरेजनुसार किती वेळ व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल हे तुम्ही वर पाहू शकता. जिओफोन नेक्स्टमध्ये ५००० हून अधिक फोटो संग्रहित केले जाऊ शकतात.

जिओफोन नेक्स्ट मध्ये मॅन्युअल टायपिंगची कोणतीही अडचण नाही. लाइव्ह ट्रान्स्क्राइब अॅप वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत सहजपणे टाइप करू शकता. ऑनलाइन क्लाससाठी मुलांना फोन दिल्यास पालकांच्या नियंत्रणाचा पर्यायही आहे.

जिओफोन नेक्स्ट मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी सूचना पॅनेलमध्ये एक बटण आहे, ज्यामुळे तुम्ही स्क्रीनवर जे काही प्ले होत आहे ते रेकॉर्ड करू शकता. तसेच,तुम्ही एका टचमध्ये स्क्रीन शॉट्स घेऊ शकता. फोनमध्ये स्क्रीन रीडिंग आणि ट्रान्सलेशनची उत्तम सुविधा आहे,जी केवळ एका टच द्वारे प्रकट होते. यामध्ये तुम्हाला10 भारतीय भाषांमध्ये भाषांतराची सुविधा मिळते. याच्या मदतीने तुम्ही10 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिलेला मजकूर सहजपणे ऐकू किंवा वाचू शकता.

या फोनमध्येOTGसपोर्ट देखील आहे. म्हणजेच तुमचाOTGपेनड्राईव्ह फोनला लावून तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्यासाठी फोनचे स्टोरेज मॅनेज करणे सोपे करेल.

जिओफोन नेक्स्ट वैशिष्ट्ये ची पुढील प्रमाणे

-स्क्रीन –5.45 इंच एचडी,कॉर्निंग गोरिल्ला ग्लास

-जिओ आणि गुगल प्रीलोडेड अॅप्स,प्रगती ऑपरेटिंग सिस्टम

-ड्युअल सिम,ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स,

-अँटी फिंगरप्रिंट कोटिंग,

-13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा,

-बॅटरी3500 mAh,

-प्रोसेसर स्नॅपड्रॅगनQM 215,2GB RAM, 32GBअंगभूत मेमरी, 512GBपर्यंत एक्सपांडेबल मेमरी

-ब्लूटूथ,वायफाय,हॉट स्पॉट, OTGसपोर्ट,जी सेन्सर,लाईट सेन्सर,प्रॉक्सिमिटी सेन्सर

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर