झाशी : हुंड्यासाठी आजही अनेक महिलांचा छळ केला जात आहे. सुशिक्षित नागरिकही हुंड्याची मागणी करतांना दिसत आहे. मात्र, झाशी येथे एका पतीने पत्नीकडे दुचाकी घेण्यासाठी ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तिने पैसे न दिल्याने पतीने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या घटनेत महिलेचा चेहरा, मान जळाली असून घटनेनंतर आरोपी पती हा फरार झाला आहे. ही घटना झारखंड येथील कांटाटोला परिसरातील मौलाना आझाद कॉलनीत रविवारी सकाळी घडली.
आमीर खान जसे आरोपी पतीचे नाव आहे. तर हीना खान असे अॅसिड हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी पत्नीला तातडीने स्थानिक नागरिकांनी आनन-फानन येथील रिम्स रुग्णालयात भरती केले आहे. तिची प्रकृती ही गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचेही लग्न काही दिवसांपूर्वी झाले होते. आमिर खान हा त्याच्या पत्नीकडे आणि तिच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी करत होता. त्याने पत्नीकडे दुचाकी घेण्यासाठी ७० हजार रुपये देण्याची मागणी केली होती. यासाठी तो तिचा छळ देखील काही दिवसांपासून करत होता. त्याच्या छळाला कंटाळून पत्नी ही पैसे आणण्यासाठी माहेरी निघून गेली होती. तिच्या वडिलांनी लवकरच पैशांची व्यवस्था करतो असे सांगत तिला पुन्हा सासरी पाठवले. रविवारी सकाळी पुन्हा अमिरने पत्नी हिनाकडे पैशांसाठी तगादा लावला. हिनाने पैसे आणले नसल्याचे सांगितल्याने आमिरचा राग अनावर झाला. त्याने त्याच्या खोलीतून अॅसिडची शीशी आणत हीना हिच्या चेहऱ्यावर ते ओतले. या अॅसिड हल्ल्यात हीनाचा चेहरा आणि छातीचा भाग गंभीररित्या भाजला. ती जोरजोराने ओरडू लागली. आमिरने तिला तसेच सोडून पळ काढला. दरम्यान, हीनाच्या ओरडण्यामुळे स्थानिक नागरिक घरात आले. तिची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तिला तातडीने दावख्यान्यात भरती केले.
अॅसिड तोंडात गेल्याने बोलण्यास असमर्थ
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हीनाच्या तोंडात अॅसिड गेल्याने तिचे तोंडही जळाले आहे. हीना ही येथील गुडदी चौकाजवळ राहते. पैसे न दिल्याने आरोपी आमिरने तिच्यावर अॅसिड फेकले असा आरोप हीनाच्या कुटुंबियांनी केला आहे. दोन महिन्यापूर्वी देखल त्याने हीनाला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिच्या टुपट्ट्याने गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने कशी बशी स्वत:ची सुटका करून घेतली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबीय एकत्र आले. त्यांनी हा तंटा सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमीरने हिनाला त्रास देणे हे सुरच ठेवले होते.
संबंधित बातम्या