Jharkhand Assembly Election Results 2024: झारखंड निवडणूक जिंकण्यासाठी भाजपप्रणित एनडीएने सर्व शक्ती पणाला लावली असली तरी त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन यांची सरकार स्थापन झाली, जे इतिहासापेक्षा कमी नाही. कारण राज्यात पहिल्यांदाच सरकारची पुनरावृत्ती झाली आहे. तर, या पराभवामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अखेर भाजपची चूक कुठे झाली? हे जाणून घेऊयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांनी झारखंडमध्ये आक्रमक प्रचार केला. भाजपच्या नेत्यांनी सुमारे २०० सभा घेतल्या. त्यापैकी सुमारे दोन डझन जाहीर सभा अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी घेतल्या. तरीही एनडीएला यश आले नाही.