मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, चंपई सोरेन नवे मुख्यमंत्री

Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, चंपई सोरेन नवे मुख्यमंत्री

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 31, 2024 09:15 PM IST

Hemant Soden Arrested by ED : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असून चंपई सोरेन राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. त्याचबरोबर हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे.

Hemant Soden Arrested by ED
Hemant Soden Arrested by ED

झारखंडमधून एक मोठी बातमी समोर आली असून. तेथे मोठी राजकीय उलथापलथ घडली आहे. हेमंत सोरेन यांनी राजभवनमध्ये जाऊन झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपई सोरेन यांची गटनेतेपदी निवड झाली असून ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील.  

त्याचबरोबर सात तासांच्या चौकशीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. सोरेन यांच्या चौकशीनंतरही त्यांच्या उत्तराने ईडीचे समाधान झाले नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री निवासस्थान, राजभवन, भाजप कार्यालयासोबतच रांचीमधली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रांचीच्या अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनतील अशी अटकल बांधली जात होती. मात्र सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपले वरिष्ठ सहकारी चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली आहेत. मनी लाँड्रींग व जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोरेन यांनी दिल्लीतून रांचीत येत झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले व त्यानंतर त्यांनी आपल्या पदाची राजीनामा दिला. 

कोण आहेत नवनियुक्त मुख्यमंत्री चंपई  सोरेन -

चंपई सोरेन हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी आहेत. त्यांचा कोल्हान भागात मोठा प्रभाव असल्याने त्यांना 'टायगर' म्हणून ओळखले जाते. 

WhatsApp channel