मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jharkhand Floor Test : चंपई सोरेन यांची आज अग्निपरीक्षा! आज फ्लोर टेस्ट, झामुमो, काँग्रेसने जारी केला व्हिप

Jharkhand Floor Test : चंपई सोरेन यांची आज अग्निपरीक्षा! आज फ्लोर टेस्ट, झामुमो, काँग्रेसने जारी केला व्हिप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 05, 2024 08:53 AM IST

Jharkhand Floor Test : मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या सरकारच झारखंड विधानसभेत महाआघाडी सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत.

Jharkhand Floor Test
Jharkhand Floor Test

Jharkhand Floor Test : झारखंड विधानसभेत मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज महाआघाडी सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. दोन दिवसीय या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यपाल भाषण करतील. यानंतर, विधानसभेच्या कार्यपद्धती आणि वर्तनाच्या नियम १३९ अन्वये मुख्यमंत्री चंपाई सोरेन विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. आधी या प्रस्तावाच्या बाजूने आणि नंतर विरोधात चर्चा होणार आहे. चर्चेनंतर मतदान घेतले जाईल.

हैदराबादमध्ये तीन दिवस तळ ठोकून सत्ताधारी पक्षाचे ३६ आमदार रविवारी संध्याकाळी विशेष विमानाने रांची येथे परतले. राजधानीतील सर्किट हाऊसमध्ये सर्वजण एकत्र राहत असून सोमवारी सकाळी एकत्रच सर्व आमदार विधानसभेत पोहोचणार आहेत.

Vasai Crime news : धक्कादायक! वसईत गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू

सत्ताधारी पक्षाच्या महाआघाडीतील घटक पक्षांनी बहुमताच्या संदर्भात सोमवारी होणाऱ्या मतदानाबाबत स्वतंत्र व्हिप जारी केला आहे. जेएमएमचे चीफ व्हिप नलिन सोरेन आणि काँग्रेसच्या आमदारांनाही व्हिप जारी करून त्यांना विधानसभेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सर्व आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करतील.

झारखंड मुंक्ती मोर्चाचे आमदार लोबिन हेमब्रम यांनी रांची येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले की ते चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करणार आहेत. हेमंत सोरेन मतदानात सहभागी होणार आहेत. झामुमोचे आमदार रामदास सोरेन दिल्लीत मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकणार नाहीत. जेएमएमचे सरचिटणीस विनोद कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह महाआघाडीत समाविष्ट जेएमएम, काँग्रेस, आरजेडी आणि एमएलचे सर्व ४८ सदस्य मतदानात सहभागी होतील.

Maharashtra Weather update: राज्यात पावसासह थंडीचा कडाका वाढणार! पुढील काही दिवस असे असेल हवामान

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाआघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांसमोर मांडण्यात आला. चंपाय यांच्या दाव्यानुसार त्यांना सहज बहुमत मिळेल. ४७ आमदारांचा पाठिंबा आणि ४३ सदस्यांचा स्वाक्षरी असलेला संमती अर्ज सादर करण्यात आला असून, बहुमतासाठी आवश्यक ४१ पेक्षा जास्त आहे.

चंपाई सरकारला सभागृहातील ४८ आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा झामुमोने केला आहे. आमदार रामदास सोरेन यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत.

मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले आहेत की, "आम्ही हा विश्वासदर्शक ठराव कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवू. विरोधकांनी कितीही कारस्थाने केली तरी आमचे सरकार आदिवासी, झारखंडमधील आदिवासी, दलित यांच्या हितासाठी काम करेल."

WhatsApp channel

विभाग