Assembly Election : घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Assembly Election : घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

Assembly Election : घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

Nov 14, 2024 07:21 PM IST

Jharkhand Assembly Election : झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी म्हटले की, आमचे सरकार आल्यास हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देऊ.

 घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर
घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

Jharkhand assembly election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ४३ जागांवर मतदार पार पडले. त्याचबरोबर २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान बोकारो जिल्ह्यात काँग्रेसचे झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी मोठं विधान केलं आहे. बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरामध्ये काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या प्रचारसभेत बोलताना गुलाम अहमद मीर यांनी म्हटले की, जर महाआघाडीचे सरकार आले तर हिंदू-मुस्लिमांसह सर्व घुसखोरांनाही४५० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडरउपलब्ध करून दिले जातील.

झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजप नेते आक्रमकपणेप्रचार करतआहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे.

झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी म्हटले की, आमचे सरकार आल्यास हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देऊ. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्यामीर यांच्या विधानामुळे ऐन निवडणुकीत भाजपच्या हातात आयतं कोलित मिळालं आहे.

चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही जनतेला वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो. कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही.

मात्र या विधानानंतर भाजप नेते काँग्रेसवर व्होट बँकेचे राजकारण करत असून राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे, अशी टीका करत आहेत.

 

अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपमागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनीम्हटले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर