Jharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Jharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Dec 05, 2024 04:06 PM IST

Jharkhand Cabinet Expansion: झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून एकूण ११ जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (PTI)

Hemant Soren Government: झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. एकूण ११ चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. झामुमोच्या सहा आमदारांना मंत्री करण्यात आले. तर, सोरेन यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या चार आमदारांना स्थान मिळाले आहे. याचबरोबर राजदचे संजय प्रसाद यादव हे देखील मंत्री झाले आहेत.

झारखंड निवडणूक निकाल झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीने गेल्या महिन्यात झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आणि ८१ सदस्यीय विधानसभेत ५६ जागा जिंकल्या. तर, भाजपप्रणित एनडीएला २४ जागांवर विजय मिळवता आला.

हेमंत सोरेन सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

१) राधाकृष्ण किशोर - कांग्रेस

२) दीपक बिरुआ - झामुमो

३) चमरा लिंडा - झामुमो

४) संजय प्रसाद यादव - राजद

५) रामदास सोरेन - झामुमो

६) इरफान अन्सारी - कांग्रेस

७) हाफिजुल हसन - झामुमो

८) दीपिका पांडे सिंह - कांग्रेस

९) योगेंद्र प्रसाद- झामुमो

१०) सुदिव्या कुमार सोनू - झामुमो

११) शिल्पा नेहा तिर्की - कांग्रेस

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर