NTA Released JEE Main Admit Card 2025: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने २२, २३ आणि २४ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. तर, २८ जानेवारी- २९ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड नंतर जारी केले जारी केले जातील. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार एनटीएची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in येथे भेट देऊ शकतात. दरम्यान, या परीक्षेसाठी हॉल तिकीट कुठून आणि कसे डाऊनलोड करायचे? हे जाणून घेऊयात.
उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना त्यावर क्यूआर कोड आणि बारकोड उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. सर्व उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी ऑनलाइन अर्जात अपलोड केलेला फोटो आयडी आणि अॅडमिट कार्डमध्ये दिलेला फोटो आयडी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
एनटीए पेपर-१ बीई आणि बीटेकची परीक्षा २२, २३, २४, २८ आणि २९ जानेवारी रोजी घेणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत परीक्षा होईल. पेपर २ बी आर्क आणि बी प्लॅनिंगची परीक्षा ३० जानेवारी रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ ते ६.३० या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
जेईई मेनमधील सुरक्षेचा विचार करून केंद्राचे गेट अर्धा तास आधी बंद करण्यात येणार आहे. एनटीएने सांगितले आहे की, सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी ७ ते ८.३० या वेळेत प्रवेश दिला जाईल. तर दुपारी ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी दुपारी १ ते २.३० या वेळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
- सर्वप्रथम jeemain.nta.nic.in. या वेबसाइटला भेट द्या.
- यानंतर अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- पुढे मस्क्रीनवर जेईई मेन अॅडमिट कार्ड दिसेल.
- जेईई मेन २०२५ अॅडमिट कार्डवर असलेली माहिती काळजीपूर्वक वाचा
- त्यानंतरच अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
जेईई मेन परीक्षा संपल्यानंतर दोन्ही सत्रातील सर्वोत्तम एनटीए गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे रँक जाहीर केले जातील. जेईई मेनच्या निकालात पहिले २,५०,००० रँक मिळवणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
संबंधित बातम्या