मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JEE Advanced 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा कुठे चेक करायचा?

JEE Advanced 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा कुठे चेक करायचा?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 11, 2022 10:53 AM IST

JEE Advanced 2022 Result: जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना गुणपत्रक डाऊनलोड करता येणार आहेत. या निकालासह जेईई अॅडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे.

जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर

JEE Advanced 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेकडून संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना गुणपत्रक डाऊनलोड करता येणार आहेत. या निकालासह जेईई अॅडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे.

उमेदवारांना अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डने लॉगइन करून JEE Advance 2020 ची अंतिम उत्तरपत्रिकासुद्धा पाहता येईल. २८ ऑगस्टला JEE Advanced 2022 ची परीक्षा झाली होती. या परीक्षेला १.५६ लाख उमेदवार बसले होते.

JEE Advanced २०२२ निकाल अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर पाहता येईल. साइट ओपन केल्यानंतर होमपेजवर JEE Advanced 2022 Result या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी उमेदवाराला त्याचे युजरनेम, पासवर्ड टाकावा लागेल. लॉग इन डिटेल्स भरल्यानंतर सबमित करा. त्यानंतर उमेदवाराला त्याचा निकाल दिसले. या निकालाचे पेज प्रिंट काढता येईल. उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी असंही सांगण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग