jaya prada : अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, मुंबईपासून हैदराबादपर्यंत शोधमोहीम सुरू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  jaya prada : अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, मुंबईपासून हैदराबादपर्यंत शोधमोहीम सुरू

jaya prada : अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, मुंबईपासून हैदराबादपर्यंत शोधमोहीम सुरू

Feb 28, 2024 11:31 AM IST

Jaya Prada : माजी खासदार, अभिनेत्री जया प्रदा यांना विशेष दंडाधिकारी न्यायालयानं फरार घोषित केलं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

jayaprada declared absconding
jayaprada declared absconding

Jayaprada declared absconding : समाजवादी पक्षाच्या माजी खासदार, अभिनेत्री जया प्रदा यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस मुंबईपासून हैदराबादपर्यंत त्यांचा शोध घेत आहेत. निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे.

जयाप्रदा नाहटा यांनी २०१९ मध्ये रामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याच्यावर स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांची सुनावणी विशेष दंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी होत असलेल्या सुनावणीच्या तारखांना जया प्रदा सातत्यानं गैरहजर राहिल्या आहेत. याच मुद्द्यावरून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.

जया प्रदा यांच्या प्रकरणात मंगळवारी पुन्हा सुनावणी होती. मात्र, त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळं न्यायालयानं कठोर भूमिका घेत त्याच्यावर सीआरपीसी कलम ८२ अन्वये कारवाई करत त्यांना फरार घोषित केलं. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ६ मार्चची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सीओ स्तरावरील अधिकाऱ्यांची टीम तयार करा

न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट काढून जयाप्रदा यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जयाप्रदा यांना अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आदेशात सीओ स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून जयाप्रदा यांना न्यायालयात हजर करा, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अनेक छापे टाकले, पण…

पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जयाप्रदा यांच्या दिल्ली कार्यालयापासून मुंबई आणि हैदराबादपर्यंत छापे टाकले आहेत. मात्र जया प्रदा यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर