धार्मिक कथा वाचक जया किशोरीने घरा-घरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती केवळभजनच चांगले गाते असे नाही तर जया किशोरी चांगली नृत्यांगणाही आहे. अनेक लोकांना माहिती नसेल की, ती डान्स रिॲलिटी शो बूगी-वूगी मध्येही सहभागी झाली होती. या शोचे जज जावेद जाफरी आणि त्यांचे भाऊ नावेद जाफरी होते. यावेळी जयाने भजनही गायले होते.
जया किशोरी मोटिव्हेशनल स्पीकर,कथा वाचक,उत्कृष्ठवक्ता,गायिका आणि निपूण डान्सर आहे. कोलकाता शहरात जन्म झालेली जया मुंबईत आल्यानंतर तिने डान्सरिॲलिटीशो बूगी वूगी मध्ये सहभागी झाली होती. तिच्या यूट्यूब चॅनेलवर याचा व्हिडिओ आहे. यामध्ये जया'मुरली मनोहर कृष्ण कन्हैया'गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
डान्स परफॉर्मेंसनंतर जावेद जाफरी यांनी जयाला प्रश्न विचारला की, ती कधीपासून डान्स शिकत आहे. त्यावर जया उत्तर देते की, क्लासिकल डान्स शिकून १ वर्ष झाले व ती २ वर्षापासून डान्स करत आहे. त्याचबरोबर १ वर्षापासून सिंगिंगही करत आहे. जावेद जाफरीने विचारले खायला आवडते का, यावर जया म्हणजे जर घरचे जेवण असेल तर मला बाजरीची भाकरी खूप आवडते. जयाने शोमध्ये कृष्ण भजन गायले होते.
जयाने शोमध्ये आपली इच्छाही व्यक्त केली होती. तिने म्हटले होते की, ती सिद्धिविनायकाला गूगली वूगली वुश करणार आहे. जया किशोरी जेव्हा भारतीच्या पॉडकास्टवर आली होती, तेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की, असे का म्हटले होते. त्यावर जयाने म्हटले की, गणपतीचे गाल गोल-मटोल दिसतात. त्यावेळी पॉन्ड्सची जाहिरात सुरू होती, त्यामुळे बोलून गेले.
संबंधित बातम्या