मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : मुलींच्या घामापासून तयार होतो भात! खवय्ये आवडीने मारतात ताव! कुठे मिळते ही विचित्र डिश? वाचा!

Viral News : मुलींच्या घामापासून तयार होतो भात! खवय्ये आवडीने मारतात ताव! कुठे मिळते ही विचित्र डिश? वाचा!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 06, 2024 09:45 AM IST

Viral News : जपानमध्ये मुलींच्या बगलेच्या घामापासून बनवलेली डिश आवडीने खाल्ली जाते. ही येथील प्रसिद्ध डिश आहे.

जपानमध्ये मुलींच्या बगलेच्या घामापासून बनवलेली डिश आवडीने खाल्ली जाते. ही येथील प्रसिद्ध डिश आहे.
जपानमध्ये मुलींच्या बगलेच्या घामापासून बनवलेली डिश आवडीने खाल्ली जाते. ही येथील प्रसिद्ध डिश आहे.

Japan Viral news : भारतात भात हे जेवणतील प्रमुख पदार्थ आहे. अनेकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. या भाताच्या वेगवेगळ्या पदार्थांची माहिती तुम्हाला असेलच. तसेच भात तयार करण्याच्या पद्धती देखील वेगळ्या वेगळ्या आहेत. आज भाताच्या अनोख्या डिशबद्दल तुम्हाला आम्ही माहिती सांगणार आहोत, ज्या बद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. तांदळापासून तयार करण्यात येणारी ही खास डिश जपानमध्ये प्रसिद्ध आहे. ही डिश मुलींच्या बगलेच्या घामापासून बनवली जाते. होय, तुम्ही जे वाचत आहात ते बरोबर आहे. कदाचित तुम्हाला हे वाचून किळसवाणे वाटेल पण, जपानमध्ये मुलींच्या बगलेच्या घामाने बनवलेली डिश ही चवीने खाल्ली जाते. या डिशची मोठी मागणी असून या साठी रांगा लावण्यासाठी देखील नागरिक तयार असतात.

ट्रेंडिंग न्यूज

ITR भरतांना 'या'; चूका करणे पडेल महागात! हातात पडेल नोटीस अन् भरावा लागेल दंड; वाचा

रिपोर्ट्सनुसार, या डिशची किंमत देखील जास्त आहे. असे असतांना नागरिक पैसे भरून ही डिश खरेदी करून आवडीने खातात. एवढेच नाही तर तांदळाचे हे अनोखे गोळे बगलेखाली दाबून त्यांना आकार दिला जातो. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, तांदळाचे गोळे तयार करणाऱ्या महिला अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छतेचे नियम पाळून ही डिश तयार करत असतात. एससीएमपीच्या अहवालानुसार, या महिला किंवा मुली अन्नाच्या संपर्कात येणारा त्यांच्या शरीराचा संपूर्ण भाग पूर्णपणे स्वच्छ करतात. काखेतील घाम काढून हा भात शिवजळ जातो. तसेच भाताच्या गोळ्याला आकार देखील काखेद्वारे दिला जातो. या पद्धतीने ही डिश तयार करून खवय्यांना दिली जाते.

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

भाताच्या गोळ्याना आकार देण्यासाठी महिला हातांऐवजी त्यांच्या बगलेचा वापर करतात. काही रेस्टॉरंट्स अगदी उघडपणे ही प्रक्रिया नागरिकांसमोर केली जाते. अहवालानुसार, जुन्या डिशची ही नवी आवृत्ती त्याच्या पारंपारिक डिश पेक्षा दहापटीने अधिक विकली जात आहे. एससीएमपीच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी डिशची ही डिश नव्या पद्धतीने तयार केली आहे त्यांच्या मते जुन्या पद्धतीत आणि नव्या पद्धतीने तयार करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी या डिशच्या चवित विशेष काही फरक पडत नाही.

IPL_Entry_Point

विभाग