Viral News: चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्ड, ३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे 'असा' रेकॉर्ड!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्ड, ३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे 'असा' रेकॉर्ड!

Viral News: चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्ड, ३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे 'असा' रेकॉर्ड!

Updated Oct 19, 2024 07:52 PM IST

Japan Viral News: जपान येथील एका व्यक्तीचे चार बायका आणि गर्लफ्रेन्ड असूनही तो लग्नासाठी आणखी बायका शोधत आहे. त्यामागचे कारणही त्याने सांगितले.

३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे 'असा' रेकॉर्ड!
३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे 'असा' रेकॉर्ड!

Japanese Man Aims To Become God of Marriage: लहान आणि आनंदी कुटुंब असावे अशी बहुतेकांची इच्छा असते. परंतु, एका व्यक्तीची इच्छा अगदी या उलट आहे. संबंधित व्यक्तीला चार बायका असतानाही त्याने दोन गर्लफ्रेन्ड बनवल्या आहेत. ही व्यक्ती जवळपास एक दशकापासून काम करत नसून त्याला देशात सर्वाधिक मुलांचा वडील बनून एक विक्रम करायचा आहे.

रयुता वतनबे (वय, ३६) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून तो जपानच्या होक्काइडो येथील वास्तव्यास आहे. वतनबे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्डसोबत राहतो. वतनबे आधीच १० मुलांचा बाप झाला असून त्याला आपल्या देशातील सर्वाधिक मुलांचा वडील बनून एक विक्रम करायचा आहे. त्याची एकूण ५४ मुलांचा वडील बनण्याची इच्छा आहे.

वतनबेच्या बायका नोकरी करतात आणि तो घरातील सर्व काम करतो. बायका कामाला गेल्यानंतर तो स्वयंपाक, घरकाम आणि मुलांची काळजी घेतो. त्यांना महिन्याला पाच लाख रुपये खर्च आहेत, जे त्याच्या सर्व बायका मिळून उचलतात. वतनबे म्हणतो की, तो दररोज वेगळ्या बायकोसोबत झोपायला जातो. एवढेच नव्हेतर तो आठवड्यात २८ पेक्षा जास्त वेळा सेक्स करतो, असाही त्याने दावा केला आहे. इतिहासात नोंद व्हावी म्हणून त्याला ५४ मुलांचा वडील बनायचे आहे. तो लग्नासाठी अजून काही बायकांचा शोध घेत आहे.

शाळेत बंदुकीसह रील बनवली, ५ विद्यार्थ्यांना अटक

बिहारच्या शाळांमध्ये शस्त्रांचा वापर वाढत आहे. ताजी घटना भोजपुर जिल्ह्यातील आहे, जिथे एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी बंदुकीने रील तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केली. मुख्याध्यापकांना कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रिल्स बनवणाऱ्या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. ही घटना बरहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैगा गावात असलेल्या उत्क्रमित माध्यमिक शाळेची आहे. रिल्स बनवण्यासाठी वापरण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुलांना वेगवेगळ्या गावातून सांगण्यात येत आहे. एसपींनी शुक्रवारी या प्रकरणाला दुजोरा दिला. शाळेत काही मुले बंदुक घेऊन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकत असल्याची तक्रार मुख्याध्यापकांकडून प्राप्त झाली. यामुळे शाळेची शिस्त बिघडत असून इतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. एसपींनी ही बाब गांभीर्याने घेत बरहरा पोलिस स्टेशनला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर