मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Japan Moon Mission : भारतानंतर 'या' देशाने करून दाखवलं! चंद्रावर केले यानाचे सॉफ्ट लॅंडींग

Japan Moon Mission : भारतानंतर 'या' देशाने करून दाखवलं! चंद्रावर केले यानाचे सॉफ्ट लॅंडींग

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 20, 2024 08:14 AM IST

Japan lands on moon : जपान हा चंद्रावर पोहोचणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे जपानी अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.

Japan lands on moon history created after chandrayaan 3
Japan lands on moon history created after chandrayaan 3

Japan lands on moon history created after chandrayaan 3 : भारताने चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचून चंद्रावर पोचचणारा चौथा देश ठारळा होता आता भारतानंतर जपानने ही कामगिरी करून दाखवली आहे. जपान चंद्रावर पोहोचणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे जपानी अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. जपानच्या एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने सांगितले की, जपानचे 'मून स्नायपर' यान हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. दरम्यान, हे यांन उतरतांना यानाची बॅटरी खाली गेली. जपान स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अंतराळयानाच्या सौर यंत्रणा वीज निर्माण करत नसल्यामुळे मोहीम ही वेळेपूर्वी आटोपती घ्यावी लागणार आहे. सध्या लँडरकडून सिग्नल मिळत असून ते अपेक्षेप्रमाणे काम करत असल्याचे देखील एजन्सीने सांगितले.

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात तापमानात होणार मोठी घट

जपानचे स्लिम मून मोहीम ही यशस्वी झाली आहे. जपानने त्यांचे अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले आहे. या यशामुळे जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत. स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन. या यशामुळे जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेचे कौतुक केले जात आहे.

Pune Metro : मेट्रो स्थानकात थरार! खेळतांना चिमुकला पडला ट्रॅकवर, वाचवतांना आईही पडली! सुरक्षारक्षकाने दिले जीवदान

हे यान ७ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले होते. चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. २५ डिसेंबर रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाची लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर इतकी आहे. या यानाच्या लँडरचं वजन २०० किलो इतकं आहे. यामध्ये रडार, लेजर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टिम आहे.

Pune Dari pool car accident : पुणे-बेंगलूर महामार्ग दरी पुलावर 'बर्निंग कार'चा थरार! व्हिडिओ व्हायरल

या यानाने जेव्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले, तेव्हा थोडा बिघाड झाला. या अंतराळ यानाच्या लँडिंगबद्दल आणखी विश्लेषणास आणखी काही वेळ लागू शकतो. इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड अॅस्ट्रोनॉटिकल सायन्सचे प्रमुख हितोशी कुनिनाका म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की रोव्हर्स लाँच केले गेले असून डेटा पृथ्वीवर पाठविला जात आहे. परंतु लँडरच्या सौर उर्जा पॅनेलमध्ये समस्या निर्माण झाली आहे. हे यान सध्या बॅटरीवर काम करत आहे.

कुनिंका म्हणाले की त्यांना विश्वास आहे की त्यांनी किमान "किमान" यश मिळवले आहे. स्मार्ट लँडर, किंवा SLIM, स्थानिक वेळेनुसार सकाळी १२.२० वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. जपानच्या अंतराळ संस्थेने शनिवारी पहाटे या बाबत माहिती दिली. त्यांचे अंतराळ यान चंद्रावर उतरले असून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे.

जपानच्या यानाने शनिवारी मध्यरात्री लँडिंग सुरू केले. १५ मिनिटांत ते चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १० किमी (सहा मैल) वर होते, असे JAXA म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतराळ संस्थेने म्हटले आहे. "पाच किलोमीटर (तीन मैल) उंचीवर, लँडर उभ्या उतरण्याच्या मोडमध्ये होता, नंतर पृष्ठभागापासून ५० मीटर (१६५ फूट) वर, सुरक्षित लँडिंग स्थान शोधण्यासाठी SLIM ला समांतर गती वाढवावी लागली.

WhatsApp channel