जम्मूमधील कारागृहांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका! कैद आहेत अनेक स्लीपर सेल्स आणि दहशतवादी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जम्मूमधील कारागृहांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका! कैद आहेत अनेक स्लीपर सेल्स आणि दहशतवादी

जम्मूमधील कारागृहांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका! कैद आहेत अनेक स्लीपर सेल्स आणि दहशतवादी

HT Marathi Desk HT Marathi
Published May 05, 2025 10:51 AM IST

jammu kashmir : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची कारवाई सुरू आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, लष्कराने पुंछमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे, जिथून आयईडी जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय जम्मूच्या तुरुंगांवर दहशतवादी हल्ल्याचाही धोका आहे.

जम्मूमधील अनेक कारागृहांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता. (AP Photo/Channi Anand, File)
जम्मूमधील अनेक कारागृहांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता. (AP Photo/Channi Anand, File) (AP)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कटाचा धोका निर्माण झाला आहे. केंद्रशासित प्रदेशातील कारागृहांवर हल्ले होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. येथे पूंछमध्ये सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडला असून, तिथून टिफिनमध्ये आयईडी सापडले आहेत. याबाबत सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे यातील काही तुरुंगात बडे दहशतवादीही शिक्षा भोगत आहेत. २२ एप्रिलरोजी झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमधील तुरुंगांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी जम्मूतील कोट बलवाल तुरुंग आणि श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या तुरुंगात दहशतवाद्यांपासून ते स्लीपर सेलच्या सदस्यांपर्यंत मोठ्या संख्येने ठेवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ते दहशतवाद्यांना रसद आणि आश्रय पुरवत असत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजी (सीआयएसएफ) यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील तुरुंग सीआरपीएफकडून ताब्यात घेऊन सीआयएसएफकडे सोपवण्यात आले होते.

लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पुंछमधील सुरनकोट येथे दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आयईडी टिफिन बॉक्समध्ये आणि दोन आयईडी लोखंडी बादलीत होते.

दहशतवादी लपले असण्याची शक्यता -

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएच्या सूत्रांनी यापूर्वी दावा केला होता की, पहलगाम हल्ल्यात सामील असलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसल्याचे आणि सक्रिय असल्याचे संकेत आहेत. या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. बैसरणयेथे झालेल्या हल्ल्यादरम्यान काही अंतरावर आणखी दहशतवादी उपस्थित होते आणि कव्हर फायर देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर