terrorist attack : गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; २ पोर्टरचीही हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  terrorist attack : गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; २ पोर्टरचीही हत्या

terrorist attack : गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; २ पोर्टरचीही हत्या

Oct 25, 2024 12:26 AM IST

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन पोर्टर्सचीही हत्या केली.

लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात लष्कराचे २ जवान शहीद झाले आहेत तर ३ जखमी झाले आहेत, तर लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेपासून (एलओसी) ५ किमी अंतरावर हा हल्ला झाला. 

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन पोर्टर्सची (कुली) हत्या केली आहे. अन्य तीन जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी हा परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका डॉक्टरसह ७ जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी एका स्थलांतरित मजुरावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.

बारामुल्ला जिल्ह्यातील बोटपाथरी येथे दहशतवाद्यांनी एका वाहनावर गोळीबार केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. याशिवाय दहशतवाद्यांनी गोळीबारात लष्कराच्या दोन पोर्टर्सचाही खात्मा केला. या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत.

हा भाग पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली असून उन्हाळ्याच्या सुरुवातीला एका दहशतवादी गटाने घुसखोरी करून अफरावत रेंजच्या उंच भागात लपून बसल्याची माहिती यापूर्वी ही मिळाली आहे. बुटापाथरी परिसर नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक बिगर स्थानिक मजूर जखमी झाल्यानंतर काही तासांतच गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या मजुराचे नाव शुभम कुमार असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आज सकाळी बटागुंड गावात दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळी त्याच्या हाताला लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर