जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर लष्कराने प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध आहे की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शुक्रू केलर भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराव घालून शोधमोहीम सुरू केली.
कुलगाम जिल्ह्यातून चकमकीला सुरुवात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली. लष्कराच्या प्रत्युत्तरात लष्कराच्या कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
शोपियानमधील केलरच्या जंगलात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली जात आहे. जंगलात २-३ दहशतवादी असण्याची शक्यता उपरोक्त लोकांनी व्यक्त केली आहे. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीर आणि किस्तवाडच्या जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आजची कारवाई पहाटे सुरू करण्यात आली असली तरी शोपियानच्या जंगलात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्यांचा पहलगाम हत्याकांडात सहभाग आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहलगाम हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या